OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) प्रत्येक आठवड्यात विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यंदाच्या ईदला (Eid 2024) अजय देवगणचा (Ajay Devgn) 'मैदान' (Maidaan) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. तर दुसरीकडे थरार, नाट्य, विनोद अशा जॉनरचे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स (Netflix), झी 5 (Zee 5), प्राईम व्हिडीओ (Prime Video) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट रिलीज होणार आहेत.
प्रेमालु (Premalu)
कधी रिलीज होणार? 12 एप्रिल
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
'प्रेमालु' हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'प्रेमालु' हा रोमँटिक चित्रपट आहे. या सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे. 'प्रेमालु' हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 12 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
लाल सलाम (Lal Salaam)
कधी रिलीज होणार? 12 एप्रिल 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. रजनीकांतची झलक या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. हा स्पोर्ट ड्रामा चित्रपट आहे. 12 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
लंबासिंघी (Lambasingi)
कधी रिलीज होणार? 12 एप्रिल 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
'लंबासिंघी' हा तेलुगू चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. 12 एप्रिल 2024 पासून प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकतो.
गामी (Gaami)
कधी रिलीज होणार? 12 एप्रिल 2024
कुठे पाहता येईल? झी5
'गामी' हा तेलुगू चित्रपट आहे. 8 मार्च 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा थरार चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रुपेरी पडद्यावर धमाका केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 12 एप्रिल 2024 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सायरन (Siren)
कधी रिलीज होणार? 11 एप्रिल 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
कीर्ति सुरेश आणि जयव रवी यांचा 'सायरन' हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शन नाट्य असणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. एंथनी भाग्यराज यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 11 एप्रिल 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या