ट्रेंडिंग
Chhaava Star Cast Fees: विकी कौशलने 'छावा'साठी घेतलं तगडं मानधन! निर्मात्यांची तिजोरी केली रिकामी, रश्मिका अन् इतर स्टार्सनं किती घेतली फी?
Chhaava Star Cast Fees: छावा (Chhava) सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. तर येसूबाई भोसले यांची भूमिका रश्मिका मंदानाने साकारली आहे.
Chhava Movie: सध्या ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, त्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' (Chhava) या चित्रपटाचा चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने आपल्या कामाचा किती मोबदला घेतला आहे, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. छावा (Chhava) सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. तर येसूबाई भोसले यांची भूमिका रश्मिका मंदानाने साकारली आहे. टाईम्स नाऊ हिंदीने दिलेल्या रिपोर्टनुसार, विकी कौशलने हे पात्र साकारण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये इतके मानधन आकारले आहे. तर या चित्रपटासाठी अभिनेत्री रश्मिका मंदानाला 4 कोटी रुपये मिळाले आहेत.
विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्यासह 'दृश्यम 2' नंतर अक्षय खन्ना 'छावा'(Chhava) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी अक्षय खन्नाला 2 कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यांना 80 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. विकी कौशलच्या या चित्रपटात दिव्या दत्ताचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला 45 लाख रुपये मिळाले आहेत. विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
चित्रपट 14 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवरती रिलीज होणार आहे. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे या तारखेला आणि चित्रपटाला विशेष महत्त्व मिळताना दिसत आहे. विक्की कौशलसोबत या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.
अंगावर काटा आणणाऱ्या 'छावा'चा टीझर पाहिलात का?
'छावा' चा टीझर लाँच झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. टीझरमध्ये विकी कौशलचा लूक, अॅक्शन पाहून त्याने या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतल्याचं दिसून आलं आहे. डोळ्यात आग, स्वराज्य रक्षणाचा ध्यास घेतलेले छत्रपती संभाजी महाराज हे मुघली सैन्याशी दोन हात करताना दिसत आहे. औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक जबरदस्त दिसून आला आहे. विकी कौशलच्या या लूकवर आणि अॅक्शनवर चाहते फिदा झाले असून त्याचे कौतुक केले आहे. विकी कौशलने टीझर शेअर करताना म्हटले की, स्वराज्याचे रक्षक, धर्माचे रक्षक, छावा- एका साहसी योद्ध्याची महाकाव्य गाथा!