Knock Knock Kaun Hai Trailer Out: सध्याचं युग हे कलियुग आहे, असं थोरामोठ्यांकडून आपण ऐकतो. या काळातील मैत्रीसुद्धा आगळी-वेगळी. त्यात मोबाईल अॅप्सचे धोकादायक जग आणि प्रेमातील मत्सर याबद्दलचा एक भयानक खेळ. ओटीटीवर एक नवीन वेब सिरीज येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळेल, तेसुद्धा अगदी मोफत. सोमवारी, 'नॉक नॉक... कौन है??' (Knock Knock Kaun Hai) या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. ही एक एडल्ट थ्रिलर सीरीज आहे, जी या महिन्यात 'अमेझॉन एमएक्स प्लेअर' वर प्रसारित होणार आहे.
ट्रेलर सुरू झाल्यानंतर एक मिनिट आणि 42 सेकंदात, आपल्याला तान्या आणि रोहन भेटतात. दोघेही चांगले मित्र आहेत. पण विश्वासघातानंतर त्यांचं नातं बिघडतं. एका पार्टीत तान्याशी गैरवर्तन होतं. यामुळे दुःखी होऊन, ती एका रहस्यमय मोबाईल अॅपची मदत घेते आणि तिच्या 'शत्रू'साठी मृत्यूची प्रार्थना करते. पण दुर्दैवानं तान्याला माहीत नव्हतं की, ही तिच्यासाठी एक मोठी समस्या बनणार आहे.
दीड मिनिटात दहशत, थरारक दृश्य
तान्यानं राग आणि निष्काळजीपणानं सुरू केलेली कहाणी लवकरच खून आणि नंतर सीरियल किलिंगच्या रक्तरंजित खेळात रूपांतरित होते. या मृत्यूच्या खेळात, मुखवट्यामागे एक खुनी लपलेला असतो. एक रहस्यमय मोबाईल अॅप आहे, जे सर्वकाही नियंत्रित करते. दीड मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा हा ट्रेलर केवळ उत्साह निर्माण करत नाही तर भीतीचं दृश्य देखील दाखवतो.
'नॉक नॉक... कौन है??' ची कास्ट
ही वेब सिरीज 'नॉक नॉक... कौन है??' अनिरुद्ध राजधरकर यांनी दिग्दर्शित केली आहे. ही कथा कामायनी व्यास आणि निखिल व्यास यांनी लिहिली आहे. या सीरिजमध्ये आध्या आनंद, कुश जोतवानी आणि अर्जुन देसवाल मुख्य भूमिकेत आहेत. तर मनिका शेवकानंद, मोना वासू, अमन मल्होत्रा, आयुष्मान ससेना, दीपांशा धिंग्रा आणि साक्षी सागर म्हाडोळकरही आहेत.
"ही सीरिज नव्या पिढीला आरसा दाखवणारी"
या सीरिजचे निर्माते सुधीर शर्मा म्हणतात की, "आमचा उद्देश अशी कथा तयार करणे होता, जी रोमांचक असेल आणि विचार करायला लावणारी देखील असेल. ही सीरिज एका भावनिक प्रवासासारखी आहे. जी आजच्या तरुण पिढीला आरसा दाखवते. कधीकधी रागाच्या भरात घेतलेला निर्णय सगळं कसं उलटं करू शकतो, हे या कथेतून आपल्याला कळतं."
'नॉक नॉक...कौन है?' ची OTT रिलीज डेट
'नॉक नॉक...कौन है?' वेब सीरीज 22 मे 2025 पासून 'अमेजन एमएक्स प्लेयर' वर स्ट्रीम होणार आहे. ही वेब सीरिज तुम्ही पूर्णपणे फ्री पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सब्सक्रिप्शनची गरज भासणार नाही.
'नॉक नॉक... कौन है??' चा ट्रेलर
महत्त्वाच्या इतर बातम्या :