Anu Aggarwal On Amitabh Bachchan: 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटातून अभिनेत्री अनु अग्रवालला (Anu Aggarwal) लोकप्रियता मिळाली. महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या 'आशिकी'मधूनच अनु अग्रवाल यांनी डेब्यू केलेला. सिनेमा रिलीज होताच अनु अग्रवाल यांचं आयुष्य पुरतं बदलून गेलं आणि त्या रातोरात स्टार बनल्या. 'आशिकी'नं बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केली. सिनेमाच्या गाण्यांपासून ते अगदी कथानकापर्यंत प्रेक्षकांनी सर्वच गोष्टींचं कौतुक केलं. अशातच, नुकतीच अनु अग्रवाल यांनी एक मुलाखत दिली आहे.
'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं एक किस्सा सांगितला. अभिनेत्रीनं तिच्या 'आशिकी' सिनेमाच्या पोस्टरमुळे मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे अमिताभ बच्चन जे नेहमी आपली वेळ पाळतात, त्यांना सेटवर पोहोचायला उशीर झालेला. त्यामुळे त्यांनी माझी माफी मागितली.
'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवाल यांनी चित्रपटाच्या पोस्टरबद्दल सांगितलं. सांगितलं की, त्यांनी खूप बातम्या दिल्या पण त्यात मुख्य भूमिकेचा चेहरा दाखवला गेला नाही. पोस्टरमध्ये अनु आणि राहुल रॉय यांचे चेहरे न दाखवल्याबद्दल आणि त्यांना प्रेक्षकांसमोर न आणल्याबद्दल निर्मात्यांवर रागावलेल्या का? असे विचारल्यावर अनु अग्रवाल म्हणाल्या की, "चित्रपटाच्या पोस्टरपेक्षाही, मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील प्रत्येक होर्डिंगवर माझ्या चेहऱ्याचा क्लोज-अप लावण्यात आला होता."
अमिताभ बच्चन यांनी मागितली अनु अग्रवालची माफी
अनु अग्रवालनं बोलताना सांगितलं की, पोस्टर पाहायला बघ्यांनी केलेल्या गर्दीमुळे अमिताभ बच्चन सेटवर उशिरा पोहोचले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका मासिकाच्या कव्हरचं शूटिंग आठवतं. मी वेळेवर पोहोचले, पण त्यावेळी अमिताभ बच्चन 20 मिनिटं उशिरा पोहोचले. सर्वात आधी त्यांनी माझी माफी मागितली. ते म्हणाले की, मला माफ कर. मी काय करू शकतो, तुझे फोटो संपूर्ण रस्त्यावर लावला होता आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
अनु अग्रवालच्या स्टारडममध्ये कमालीची वाढ झालेली
अनु अग्रवाल म्हणाल्या की, "म्हणूनच माझ्या चेहऱ्याचं एक मोठे पोस्टर सर्वत्र लावण्यात आलं होतं आणि त्यावर टॅग लाईन होती की, हा चेहरा गर्दीला रोखू शकतो. आणि लोक माझा चेहरा आधीच ओळखत होते, कारण मी त्यापूर्वी एक मॉडेल होते." दरम्यान, याच मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं तिला 'आशिकी'साठी पूर्ण फी दिली नव्हती. फक्त 60 टक्के रक्कम देण्यात आली. आणि 40 टक्के अजूनही शिल्लक आहे, असा खुलासा केलाय.