Most Watched Films On OTT: OTT वर मनोरंजनाची मेजवाणी, फक्त आणि फक्त साऊथ फिल्म्सचाच जलवा; कुठे आणि काय पाहाल?

Most Watched Films On OTT: थिएटर गाजवल्यानंतर, अनेक चित्रपटांना ओटीटीवरही उत्तम प्रतिसाद मिळतो. गेल्या आठवड्यातही प्रेक्षकांनी ओटीटीवरील अनेक चित्रपटांचा पुरेपूर आनंद घेतला.

Most Watched Films On OTT

1/8
ऑरमॅक्स मीडियानं 12 ते 18 मे दरम्यान ओटीटीवर वर्चस्व गाजवणाऱ्या टॉप 5 भारतीय चित्रपटांची यादी शेअर केली आहे. विशेष म्हणजे, या यादीत दक्षिणेकडील चित्रपटांनी बाजी मारली आहे. 5 पैकी चार नावं फक्त दाक्षिणात्य चित्रपटांमधील आहेत.
2/8
अजित कुमार यांचा 'गुड बॅड अगली' हा तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपट यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि त्यानं थिएटरमध्ये खळबळ माजवली.
3/8
हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. गेल्या आठवड्यात 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट 6.1 मिलियन व्ह्यूजसह ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
4/8
या यादीत तमन्ना भाटियाचा 'ओडेला 2' दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रसारित होत आहे, जो गेल्या आठवड्यात तो 6.8 मिलियन लोकांनी पाहिला.
5/8
जॉन अब्राहम आणि सादिया खतीब यांच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
6/8
या चित्रपटाला 3.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अशाप्रकारे, गेल्या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेल्या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत समावेश झालेला हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे.
7/8
या यादीत 'मॅड' स्क्वेअर चौथ्या क्रमांकावर आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारा हा चित्रपट 1.8 मिलियन लोकांनी पाहिला आहे.
8/8
या यादीत वीरा धीरा सुरण भाग-2 चाही समावेश आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे आणि त्याला 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Sponsored Links by Taboola