Al Pacino Injury On Private Part : जगभरात सध्या रिमेकचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लवकरच गॉडफादर चित्रपटाचाही रिमेक येणार आहे. या निमित्ताने गॉडफादर फेम प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचिनो यांची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या जीवनातील काही मनोरंजक किस्से सांगितले आहेत. त्यांनी त्याच्या बालपणात केलेल्या एका चुकीबद्दल सांगितलं, जी त्यांना चांगलीच महागात पडली.
टॉप अभिनेत्याच्या प्रायव्हेट पार्टला जखम
हॉलिवूड अभिनेता अल पचिनो यांनी त्यांच्या बालपणीचे काही किस्से सांगितले आहेत. स्कारफेस अभिनेता अल पचिनो यांनी त्याच्या 'सनी बॉय' या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितलं आहेत. त्यातीलच एक किस्सा त्यांनी मुलाखतीत शेअर केला. अल पचिनोने यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बालपणी एक मोठी चूक केली होती आणि त्यामुळे तो अडचणीत आला होता.
छोटी चूक पडली चांगलीच महागात
अल पचिनो यांनी सांगितलं की, "आजही तो प्रसंग आठवल्यावर अंगावर काटा येतो. आजही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो क्षण आठवल्यावर अस्वस्थ व्हायला होतं." अल पचिनो यांच्या एका चुकीमुळे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली होती. तेव्हा ते अवघ्या 10 वर्षांचे होते. 'सनी बॉय' या पुस्तकात अल पचिनो यांनी सांगितलं आहे की, ते एकदा पावसाळ्यात हातात लोखंडी सळी घेऊन नाचत-नाचत रस्त्याने चालत होते आणि अचानक त्यांचा पाय घसरला. यामुळे लोखंडी रॉड त्यांच्या दोन्ही पायांच्यामधून प्रायव्हेट पार्टला लागला आणि दुखापत झाली.
"मी बेडवर होतो अन्..."
या दुर्घटनेवेळी ते गंभीर दुखापतीतून वाचले, पण त्यांच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाली होती. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील सर्वात लाजीरवाणा आणि धक्कादायक प्रसंग असल्याचं म्हटलं. या घटनेचा मानसिकदृष्ट्या आघात झाल्याचं त्यांनी सांगितलं, ज्याचा परिणाम आजही त्यांच्यावर होतो. त्यांनी पुढे सांगितलं की, मी बेडवर होतो आणि माझी पँट घोट्यांभोवती बांधलेली असायची आणि या काळात आई, काकू आणि आजी त्याची देखभाल करत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :