Amit Shah-Junior NTR: देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान नुकतीच त्यांनी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव (Ramoji Rao Garu) यांची भेट घेतली. या भेटीनंतर ट्विट करत अमित शाह यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले आहे. सोबतच त्यांनी या भेटीदरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांनी हैदराबादमध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या दौऱ्या दरम्यान अमित शाह यांनी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीला देखील भेट दिली आणि संस्थापक रामोजी राव यांची भेट घेतली. या भेटीनंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


पाहा अमित शाह यांची पोस्ट :


अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्युनियर एनटीआर आणि रामोजी राव यांच्यासोबतच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे दिग्गज एकमेकांशी बोलताना दिसत आहे. यावेळी अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबतचे हे फोटो शेअर करताना गृहमंत्री अमित शाह यांनी त्याचे कौतुक करत लिहिले की, ‘हैदराबादमध्ये तेलुगू सिनेमातील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचे रत्न ज्युनियर एनटीआरसोबत छान संवाद साधला.’ तर, रामोजी राव यांच्या सोबतचे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘श्री रामोजी राव गरू यांचा जीवन प्रवास चित्रपट उद्योग आणि माध्यमांशी संबंधित लाखो लोकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. आज त्यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली.’



ज्युनियर एनटीआरचे केले कौतुक


साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे चाहते देशभरात पसरलेले आहेत. नुकताच त्याचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. अमित शाह आणि अभिनेता ज्युनियर एनटीआर यांची हैदराबादमध्ये भेट झाली. अमित शाह यांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत आणि त्यासोबत त्यांनी केले आहे.



दोन दिग्गजांच्या भेटीने उंचावल्या भुवया


अमित शहा हे राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्त्व आहेत, तर ज्युनियर एनटीआर हा चित्रपट जगतातील अनुभवी कलाकार आहे. आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या भेटीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जवळपास दहा हजार लोकांनी हे फोटो रीट्विट केले असून, अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.


2009पासून, अभिनेता ज्युनियर एनटीआर टीडीपी नेते किंवा इतर पक्षांच्या नेत्यांसोबत दिसलेला नाही. राजकारणाऐवजी त्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे.  त्याचे वडील नंदामुरी हरिकृष्ण हे 2008 ते 2013पर्यंत टीडीपीचे राज्यसभा सदस्य होते. त्याचे काका आणि अभिनेते नंदामुरी बालकृष्ण हे आंध्र प्रदेशातील टीडीपीचे आमदार आहेत. मात्र, आता या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


हेही वाचा :


Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!


RRR च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरणला कोणाचा आवाज; ऐकून तुम्ही व्हाल थक्क