RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. हिंदी व्हर्जनमधील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची भूमिकेचे डबिंग नक्की कोणी केले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात चित्रपटाच्या डबिंगबाबत....
आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी त्यांच्या स्वत: च्या भूमिकेला आवाज दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टकडून व्हॉइज ऑव्हर करण्यापेक्षा राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला स्वत:चा आवाज देण्याचा निर्णय घेतला. द कपिल शर्मा शोमध्ये एनटीआरनं सांगितलं, 'हैद्राबादमध्ये अनेक लोक हिंदी भाषेत बोलतात. तसेच शाळेत असताना मी हिंदी भाषेमधून शिक्षण घेतलं. कारण माझ्या आईची इच्छा होती की मी ही भाषा शिकावी.'
हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांची पसंती
आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 120 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी (29 मार्च) या चित्रपटानं 100 कोटीचा आकडा पार केला. रिपोर्टनुसार, या चित्रपटानं सहाव्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 122 कोटींपर्यंत झाले आहे. आरआरआर हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bollywood : जंजीरमध्ये काम केल्यानंतर राम चरणने 'या' कारणांमुळे बॉलिवूडमध्ये काम केले नाही; अभिनेत्याचा गौप्यस्फोट
- RRR Box Office Collection Day 6 : 'आरआरआर' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; सहाव्या दिवशी कोट्यवधींची कमाई
- RRR : 65 दिवस एकाच सिनचं शूटिंग; 'भीम' भूमिकेसाठी ज्युनियर एनटीआरची मेहनत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha