Jr NTR New Movie : अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr.NTR) आज त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाचं निमित्त साधत त्याने प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं आहे. अभिनेत्याने आज (20 मे) त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबतच या चित्रपटाचे मोशन पोस्टरही निर्मात्यांनी रिलीज केले आहे. या मोशन पोस्टरवरून लक्षात येते की, एनटीआरचा हा चित्रपटही जबरदस्त अॅक्शन थ्रिलरने परिपूर्ण असणार आहे. फॅन्सही त्यांच्या लाडक्या अभिनेत्याच्या या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव जरी समोर आले नसले, तरी ‘NTR30’ या नावाने चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. एनटीआरच्या या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन कोर्टाला शिवा करणार आहेत. अभिनेता एनटीआर आणि कोर्टाला एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये 'जनता गॅरेज' या चित्रपटाचे दिग्दर्शनही कोर्टाला सिवा यांनी केले होते आणि हा चित्रपट यशस्वी ठरला होता.
ज्युनियर एनटीआरचा मेगा बजेट चित्रपट
ज्युनियर एनटीआरचा हा चित्रपट सुधाकर मिक्किलीनेनी आणि हरी कृष्णक निर्मित करतील, तर नंदामुरी कल्याण राम प्रस्तुत करणार आहेत. अभिनेत्याचा हा चित्रपट मेगा बजेट असणार आहे. सध्या तरी या चित्रपटाच्या रिलीज किंवा स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
‘आरआरआर’ नेटफ्लिक्सवर हिंदीत रिलीज होणार!
‘आरआरआर’ चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नियोजित तारखेच्या जवळपास दोन आठवडे आधी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. अर्थात चाहत्यांना ‘आरआरआर’ हिंदीच्या ओटीटी रिलीजसाठी आता फक्त काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेटफ्लिक्सने याआधीच घोषणा केली होती की, चित्रपटाचे हिंदी व्हर्जन 2 जून रोजी स्ट्रीम केला जाईल. परंतु, गुरुवारी प्लॅटफॉर्मने माहिती दिली की, RRR हिंदी 2 जून ऐवजी 20 मे रोजी स्ट्रीम केला जाईल. ज्युनियर एनटीआरच्याचाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
हेही वाचा :
- Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
- Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
- कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!