Cannes Film Festival 2022: चित्रपट विश्वातील सर्वात महत्त्वाच्या महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival 2022) 75व्या पर्वाला मंगळवारी (17 मे) सुरुवात झाली. हा सोहळा 28 मे पर्यंत चालणार आहे. यंदाचा कान्स महोत्सव भारतासाठी खूप खास असणार आहे. कारण यंदाच्या कान्स महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच यावेळी भारत आणि फ्रान्स राजनैतिक संबंधांची 75 वर्षेही साजरी करत आहेत. 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील अनेक प्रसिद्ध चेहरे आपला जलवा दाखवताना पाहायला मिळणार आहेत.
यात सहभागी होणाऱ्या काहींसाठी हा पहिलाच अनुभव असणार आहे. यासोबतच भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर देखील यावेळी कान्समध्ये सहभागी होणार आहेत. एकीकडे दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा रेड कार्पेटवर धुमाकूळ घालताना दिसणार आहेत, तर इतर अनेक स्टार्स या वर्षी पहिल्यांदाच कान्समध्ये धुमाकूळ घालणार आहेत.
ऐश्वर्या राय : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सौंदर्याचे जलवे दाखवताना दिसणार आहे. ऐश्वर्या जवळपास 2 दशकांपासून म्हणजे 2002पासून कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे.
दीपिका पदुकोण : अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी यंदाचा कान्स महोत्सव खूप खास आहे. कारण, या वर्षी दीपिका पाहुणी नसून, कान्स ज्युरीचा एक भाग असणार आहे. म्हणजेच दीपिका येथे परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे.
नयनतारा : साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच दिसणार आहे.
पूजा हेगडे : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेचा देखील हा पहिलाच कान्स चित्रपट महोत्सव असेल, ज्यामध्ये ती आपला जलवा दाखवताना दिसणार आहे.
तमन्ना भाटिया : दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर धमाल करताना दिसणार आहे.
आदिती राव हैदरी : बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणार आहे.
हिना खान : टीव्ही अभिनेत्री हिना खानने 2019 मध्येही कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला होता. अभिनेत्री या वर्षीही धमाल करताना दिसणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी : केवळ महिलाच नाही, तर यंदा पुरुष कलाकारही कान्समध्ये पदार्पण करणार आहेत. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीही पहिल्यांदाच कान्समध्ये सामील होणार आहे.
आर माधवन : अभिनेता आर माधवनही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.
हेही वाचा :
Rang Majha Vegla : दीपिकाची खोटी आई घरी येणार! लेकीसमोर कार्तिकचं बिंग फुटणार?
ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!