Brahmastra : लवकरच ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), मौनी रॉय (Mouni Roy), नागार्जुन (Nagarjun), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) केलं आहे. हा चित्रपट तीन पार्ट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपट निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अयान मुखर्जीनं अस्त्रांची माहिती दिली आहे. 


अस्त्रांची दिली माहिती


वानरास्त्र, नंदी अस्त्र, प्रभास्त्र, जलास्त्र, पवनास्त्र या अस्त्रांची माहिती अयाननं दिली आहे. त्यानंतर त्यानं ब्रह्मास्त्रबाबत देखील सांगितलं. तो म्हणाला, 'आम्ही हे अस्त्रांचे जग तयार केले आहे. ज्याचं नाव अस्त्रवर्स आहे. ब्रह्मास्त्र हा अस्त्रवर्सचा पहिला भाग आहे. याची सुरुवात प्राचीन भारताच्या एका सीननं होते. ज्यामध्ये ऋषीमुनी हिमालयामध्ये तपस्या करतात. त्यांच्या तपस्येमुळे त्यांना एक वरदान मिळते. त्यांना एक अखंड ज्योत मिळते. ही एक ब्रह्म शक्ती आहे. ब्रह्म शक्तीमधून अस्त्रांचा जन्म झाला.'


'हे एक असे अस्त्र आहे जे प्राण्यांच्या शक्तीवर नियंत्रण मिळवते. वानरास्त्रामध्ये वानरांची शक्ती आहे तर नंदीअस्त्रांमध्ये हजारो नंदींची शक्ती आहे. ऋषीमुनींच्या सर्वात शक्तीशाली अस्त्राचे नाव ब्रह्मास्त्र आहे.' असंही अयाननं सांगितलं. 


पाहा व्हिडीओ":



ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षक ब्रह्मास्त्र या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


हेही वाचा:


Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे झालेल्या वादावर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया ; म्हणाला...