Pushpa The Rule : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या त्यांच्या आगामी 'पुष्पा: द रुल'(Pushpa : The Rule) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'चे बजेट 350 कोटीपेक्षा अधिक आहे. पुष्पाच्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागाचे म्हणजेच 'पुष्पा: द रुल'चे बजेट अधिक आहे.
'पुष्पा: द रुल'च्या शूटिंगला सुरुवात
'पुष्पा: द रुल' या सिनेमाच्या बजेटविषयी निर्मात्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. सुकुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची सुरुवात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच्या करणार आहेत. पुष्पा सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने निर्मात्यांनी पुष्पा सिनेमाच्या दुसऱ्या भागाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आहे.
'पुष्पा: द रुल' या सिनेमाच्या कथानकावर सध्या काम सुरू आहे. या सिनेमाचे शूटिंग गोदावरीच्या मारेदुमिली जंगलात होणार आहे. या सिनेमाचे शूटिंग जानेवारीमध्ये पूर्ण होणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाचे बजेट 195 कोटी होते. तर दुसऱ्या भागाचे बजेट 350 कोटी आहे.
'पुष्पा: द राइज'ने हिंदीत केली 110 कोटींची कमाई
'पुष्पा: द राइज' हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अल्लू अर्जुन पुष्पराज हे पात्र साकारले होते. तर रश्मिका मंदान्नाने या सिनेमात श्रीवल्ली हे पात्र साकारलं होतं. हा सिनेमाच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पुष्पा: द राइज या सिनेमाने हिंदीत 110 कोटींची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने धुमाकूळ घातला होता.
संबंधित बातम्या