Brahmanandam : सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिंटींनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका छोट्या भूमिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यातीलच एक म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन ब्रह्मानंदम (Brahmanandam).
ब्रह्मानंदम यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1956 रोजी आंध्र प्रदेशमधील सातेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील फक्त ब्रह्मानंदम यांनीच एमए पर्यंत शिक्षण घेतले. आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर ते अटिल्ली कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी करू लागले. कॉलेजमध्ये ते अनेकदा नक्कल करून विद्यार्थ्यांना हसवत असे.
कॉमेडियन ब्रह्मानंदमचे करिअर
ब्रह्मानंदम यांना एकदा आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत र्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचे पारितोषिक मिळाले, त्यानंतर त्यांची नाटकाची आवड आणखीनच वाढली. याच काळात प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शक जंध्यायला यांनी ब्रह्मानंदम यांना 'मोद्दाबाई' नावाच्या नाटकात अभिनय करताना पाहिले. ब्रह्मानंदमच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांना जंध्यायलांनी 'चंताबाबाई' सिनेमात एक छोटी भूमिका दिली. या सिनेमापासून ब्रह्मानंदम यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली.
त्यानंतर ब्रह्मानंदम यांनी जांध्यालाचा दुसरा सिनेमा 'आहा न पेल्लानता' या सिनेमात काम केले. या सिनेमाने ब्रह्मानंदमला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ब्रह्मानंदम यांनी आतापर्यंत 1000 हून अधिक सिनेमे केले आहेत. यामुळेच त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती 320 कोटी आहे. त्यांच्याकडे ऑडी R8,ऑडी Q7, मर्सिडीज बेंज सारख्या आलिशान गाड्या आहेत. याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची शेतजमीन आहे. तसेच त्यांचा हैदराबादमधील जुबली हिल्सवर एक आलिशान बंगला आहे. त्यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : सलमान खानकडून प्रतीक सहजपालला मिळाली खास भेट
Kangana Ranaut : ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत बनणार होस्ट, एकता कपूरच्या शोचं करणार सूत्रसंचालन!
Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha