Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) ची तेजस्वी प्रकाश विजेती झाली आहे. मात्र प्रतीक सहजपालला (Pratik Sehajpal) प्रेक्षकांचे सर्वाधिक प्रेम मिळत आहे. प्रतीक 'बिग बॉस 15'चा विजेता व्हावा असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. 'बिग बॉस 15'चा शो संपल्यानंतर सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यादरम्यान सलमानने प्रतीकला एक खास भेट दिली आहे. 

Continues below advertisement


सलमान खानने पार्टीमध्ये प्रतीक सहजपालला एक टी-शर्ट भेट दिला आहे. पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रतीकनेदेखील या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करण्यासोबत प्रतीकने सलमानचे आभार मानले आहेत. फोटोमध्ये प्रतीकने पांढरा टी-शर्ट घातलेला दिसत आहे आणि सलमान त्याच्यासोबत उभा आहे. फोटो शेअर करण्यासोबत प्रतीकने लिहिले की,"प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि या टी-शर्टसाठी भाऊ धन्यवाद. मला आशा आहे की, तुम्हाला माझा
अभिमान वाटेल".






'बिग बॉस 15'च्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले. अखेर तेजस्वी प्रकाश विजेती ठरली. पण नेटकऱ्यांच्या मते 'बिग बॉस 15'चा खरा विजेता प्रतीक सहजपालच आहे.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत बनणार होस्ट, एकता कपूरच्या शोचं करणार सूत्रसंचालन!


Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज


Shabana Azmi Corona Positive : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha