Kangana Ranaut : 'बिग बॉस 15' शो बंद संपल्यानंतर लगेचच, निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) तिच्या नवीन रिअ‍ॅलिटी शोची घोषणा केली आहे. हा मनोरंजन विश्वातील सर्वात खतरनाक शो म्हणून ओळखला जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता एकताचा हा शो कंगना रनौत (Kangana Ranaut) होस्ट करणार असल्याची चर्चा आहे.

Continues below advertisement

एका सूत्राने बॉलिवूड हंगामाशी बोलताना की, निर्मात्यांनी याबाबत एकताने कंगनाशी चर्चा केली आहे. या शोसाठी कंगनापेक्षा चांगली अभिनेत्री असूच शकत नाही, असे एकताला वाटत आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून कंगना पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसणार आहे. कंगनाने देखील या शोला होकार देण्याचे मान्य केले आहे.

असा शो प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिला नसेल!

Continues below advertisement

सूत्रानुसार, शोचा फॉरमॅट 'बिग बॉस'सारखाच असणार आहे. या शोमध्ये स्पर्धकांना 8-10 आठवडे एकाच ठिकाणी कैद केले जाईल. बिग बॉसप्रमाणेच सेटवरही कॅमेरे असतील आणि स्पर्धकांना काही टास्क देण्यात येतील. हा एक लाईव्ह शो असणार आहे, जो ALT बालाजी आणि MX Playerवर प्रसारित होईल. प्रेक्षकांनी असा शो याआधी कधीच पाहिला नसेल, असा दावा केला जात आहे.

एकताची लाडकी कंगना!

‘टीव्ही क्वीन’ एकता ही एक यशस्वी चित्रपट निर्माती, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मची मालक आहे. तिच्या ALT बालाजी प्लॅटफॉर्मवर, सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी सामग्री तयार केली गेली आहे. आता एकताने ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player सोबत हातमिळवणी केली आहे.

कंगनाची बॉलिवूडमधील मोजक्याच लोकांशी मैत्री आहे. एकता ही त्यापैकीच एक आहे. 'शूटआऊट अ‍ॅट वडाळा' या चित्रपटात दोघींनी पहिल्यांदा एकत्र काम केले. कंगनाने एकताच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही, पण एकता-कंगना यांची मैत्री चांगलीच रंगली. कंगनाचा शेवटचा चित्रपट 'थलायवी' पाहिल्यानंतरही एकताने तिचे तोंडभरून कौतुक केले होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha