Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा द राइज' (Pushpa The Rise) या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा' सिनेमामुळे अल्लू अर्जुन सोशल मीडियावर सतत ट्रेंडमध्ये आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना होऊन गेला असला तरी सर्वत्र 'पुष्पा' सिनेमाचीच चर्चा आहे. सिनेमाला मिळत असलेल्या यशामुळे निर्मात्यांनी सिनेमासंदर्भात घेतलेला मोठा निर्णय घेतला.
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत अल्लू अर्जुनने पुष्पा सिनेमा संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. अल्लू अर्जुन म्हणाला, टीआरपी आकडे वाढत असल्याने आम्ही पुष्पा सिनेमा इतर भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री होती की, प्रेक्षक माझा सिनेमा पाहायला सिनेमागृहात नक्की येतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे माझ्यावरचे प्रेम समजत आहे.
पुष्पा' सिनेमाचे 'बाहुबली'चे तोडले रेकॉर्ड
अल्लू अर्जनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात प्रभासच्या बाहुबली सिनेमाचे रेकॉर्ड मोडले आहेत. बाहुबली सिनेमाने हिंदीत 5.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात सहा कोटींची कमाई केली आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पुष्पा सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट झाली आहेत. यूजर्स या गाण्यांवर रील बनवत आहेत. या गाण्यांचे रील इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या
Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज
Shabana Azmi Corona Positive : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha