Shahrukh Khan Pathaan On Twitter : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांवर सध्या बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज कोणत्या ना कोणत्या सिनेमावर किंवा कलाकारांवर बहिष्कार टाकला जात आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. अशातच आता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'पठाण'(Pathaan) सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' प्रदर्शित झाल्यानंतरदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमावर बहिष्कार घातला जात आहे. अशातच किंगखानच्या 'पठाण' सिनेमावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. #BoycottPathan सध्या ट्विटरवर चर्चेत आहे. शाहरुखला त्याचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
'पठाण' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी का होत आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रिपोर्टनुसार, सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये गेल्याच्या प्रकरणावर चाहते संतापले असून ते 'पठाण' सिनेमावर बहिष्कार घालत आहेत.
25 जानेवारीला सिनेमा होणार प्रदर्शित
'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे. तर आदित्य चोप्राने या सिनेमाची निर्मिती केली आहे. टीझर आणि दीपिकाचा लुक आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमासाठी शाहरुखने 85 कोटींचे मानधन घेतलं आहे. या सिनेमात सलमान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख पाच वर्षांनी रुपेरी पद्यावर पदार्पण करणार आहे.
संबंधित बातम्या