30 Years Of Shah Rukh Khan: बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आज मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची 30 वर्ष पूर्ण केली आहेत. याच खास निमित्ताने आज त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळाले आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देत, त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.


याच निमित्ताने आज त्याचा ‘पठाण’ चित्रपटातील नवा लूक रिलीज झाला आहे. शाहरुख खाननेही सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता हातात बंदूक घेऊन रक्ताने माखलेला शाहरुख खान दिसत आहे. 'पठाण'चे पोस्टर रिलीज करताना शाहरुख खान लिहिले की, '30 वर्षे... तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. आता हा प्रवास 'पठाण'सोबत पुढे जाणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.’


पाहा पोस्ट :



शाहरुखच्या या प्रवासाबद्दल बोलताना दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, ‘शाहरुख खानची 30 वर्षे हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक सिनेमॅटिक क्षण आहे आणि आम्ही तो जागतिक स्तरावर त्याच्या लाखो चाहत्यांसह साजरा करू इच्छित होतो. आज शाहरुख खानचा दिवस आहे आणि आपल्याला त्याबद्दल जगाला सांगण्याची गरज आहे. चित्रपटसृष्टीतील त्याच्या अतुलनीय प्रवासात त्याने आपल्या सर्वांना दिलेल्या असंख्य आठवणींसाठी शाहरुखचे आभार मानण्याची ही टीम पठाणची स्टाईल आहे.’


रिपोर्टनुसार, पठाण या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं. या चित्रपटात शाहरूखसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी देखील पठाण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता सलमान खान हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे निर्माते यश राज फिल्म्स यांनी एक खास व्हिडीओ शेअर करून या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. व्हिडीओमध्ये शाहरूख, जॉन आणि दीपिका दिसत आहेत.


हेही वाचा :