Laal Singh Chaddha Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) यांचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा (Forest Gump) हिंदी रिमेक आहे. आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण आता कलेक्शन (Laal Singh Chaddha Box Office Collection) पाहता या चित्रपटाला फारशी पसंती मिळत नसल्याचे लक्षात येत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला होता आणि आता दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. जे पाहून असे म्हणता येईल की, हा चित्रपट चित्रपटगृहात फारशी चांगली कमाई करत नाहीये.


या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आमिर खानच्या या चित्रपटाला मोठा विरोधही होत आहे. याबाबत आमिर खाननेही आपले मत मांडले आहे. आमिर खानने या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना एकदा 'लाल सिंग चड्ढा' पाहण्यास सांगितले आहे. हा चित्रपट आमिर खानचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्यासाठी आमिर आणि करीनाने खूप मेहनत घेतली आहे.


दुसऱ्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!


बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारच वाईट अवस्था आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ 7 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 19 कोटींच्या घरात जाणार आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला होता. आमिरच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी कलेक्शन मानले जात आहे.


दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन इतके कमी झाल्यानंतर वीकेंडला या चित्रपटाचे कलेक्शन वाढण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र, ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला सध्याच्या सुट्टीचा फारसा फायदा झालेला नाही.


‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक


‘लाल सिंह चड्ढा’ हा ‘फॉरेस्ट गंप’ या सहा ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यांनी मूळ चित्रपट पाहिला असेल, त्यांना हा चित्रपट कदाचित आवडणार नाही. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप विरोध झाला असला, तरी आमिर आणि करीनाचे चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ आवर्जून पाहत आहेत. अनेक विरोधानंतर अखेर हा चित्रपट पाहण्यासाठी काही लोक चित्रपटगृहात पोहोचले आहेत.


वाचा इतर बातम्या: