Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  या रिएल्टी शोची संबंधित दररोज नवनवीन अपडेट्स येत असतात. या शोचे होस्टिंग सलमान खान (Salman Khan) करणार नसल्याच्याही चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडे आता ओटीटीवरील या बिग बॉसमध्ये कोणते सेलेब्स सहभागी होणार,  याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. काही सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. या सगळ्या चर्चांमध्ये आता टीम इंडियाच्या धडाकेबाज क्रिकेटपटूची शो मध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 


कोणता क्रिकेटपटू होणार सहभागी?


टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे नाव सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस ओटीटी शो'च्या टीमने शिखर धवन याला याबाबत विचारणा केली असल्याची माहिती आहे. 'बिग बॉस ओटीटी' मधील सहभागाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  मात्र, शिखर धवन याने बिग बॉस ओटीटी मध्ये यावे अशी चाहत्यांची इच्छा असणार. 


शिखरला येतेय मुलाची आठवण...






काही दिवसांपूर्वी शिखरने सोशल मीडियावर सांगितले होते की, तो त्याच्या मुलाला खूप मिस करत आहे. ते म्हणाले होते की, मी एका आठवड्यासाठी माझ्या मुलाला भेटायला गेलो होतो, तेव्हा तो काही तासांसाठीच मला भेटायला आला होता. मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता, त्याला माझ्या मिठीत झोपायचे होते, घट्ट मिठी मारायची होती. त्याला पितृत्वाचे प्रेम द्यायचे होते. मागील 5-6 महिने त्याच्यासोबत काही बोलणं झाले नसल्याचे शिखर धवनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 


शिखरने सांगितले की, अजूनही मी खूप सकारात्मक आहे आणि मुलावर खूप प्रेम करतो आणि त्याने नेहमी आनंदी राहावे अशी त्याची इच्छा आहे. 


'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'हे' सेलिब्रिटी दिसू शकतात... (Bigg Boss OTT 3 Contestants)


'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या दोन सीझनच्या यशानंतर निर्मात्यांनी तिसरा सीझनदेखील यशस्वी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनची दिव्या अग्रवाल विजेती झाली होती. तर दुसऱ्या पर्वाचा एल्विश यादव विजेता झाला होता. तर दुसरा रनरअप अभिषेक मल्हान होता. दिल्लीची वडा पाव गर्ल तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. वडा पाव गर्लसह अर्यांशी शर्मा, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, रोहित खत्री, दलजीत कौर, अरहान बहल, शीझान खान, मॅक्सटर्न, ठगेश, श्रीराम चंद्रा आदि स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.