एक्स्प्लोर

महाराष्ट्र बंदचा बॉलिवूडला फटका, थिएटर बंद, शूटिंगही रखडलं!

हिंदीमध्ये ‘यह रिश्ता क्या कहलाता’, ‘पिया अलबेला’, ‘साम दाम’ आदी हिंदी मालिकांची फिल्मसिटीमधली शूटिंग रद्द झाली आहेत. फिल्मसिटीमध्ये ‘विठूमाऊली’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिंकांची शूटिंग चालू आहेत.

मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या रास्ता रोकोचे तीव्र पडसाद मायापुरीतल्या मनोरंजनसृष्टीवरही उमटले आहेत. काही ठिकाणी कलाकार उशीरा सेटवर पोहोचले. काही मंडळी रास्ता रोकोमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत सापडले, तर पुण्याहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या अनेक कलाकारांनी आपली मुंबईवारी रद्द केली. यातला मोठा फटका टीव्ही इंडस्ट्रीला बसला. हिंदी सिनेसृष्टी, मराठी सिनेसृष्टी, मालिका, नाटक इत्यादींना महाराष्ट्र बंदचा मोठा फटका बसला. यातल्या अनेक मालिकांची शूटिंग सकाळी सुरु होत असल्यामुळे थेट कलाकारांना याचा फटका बसलेला नाही. अनेक मालिकांच्या सेटवर दुपारचं जेवण मात्र पोहोचू शकलेलं नाही. ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेचं शूट ठाण्याला सुरु आहे. शूट व्यवस्थित सुरु असलं तरी रास्ता रोकोमुळे या टीममधल्या 100 लोकांचं जेवण मात्र पोहोचू शकलेलं नव्हतं. हिंदीमध्ये ‘यह रिश्ता क्या कहलाता’, ‘पिया अलबेला’, ‘साम दाम’ आदी हिंदी मालिकांची फिल्मसिटीमधली शूटिंग रद्द झाली आहेत. फिल्मसिटीमध्ये ‘विठूमाऊली’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिंकांची शूटिंग चालू आहेत. या कलाकारांना आत घेण्यासाठी फिल्मसिटीमधलं 5 नंबर गेट उघडण्यात आलं आहे. होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मालिकांच्या प्रॉडक्शन हाऊसेसनी चारचाकी ऐवजी दुचाकी पाठवून कलाकारांना सेटवर आणलं. या रास्तारोकोचा फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. बुधवारचे सर्व थिएटर्सचे मॉर्निंग शो सुरु झाले खरे. पण मुंबईतली स्थिती लक्षात घेता त्यानंतर मात्र सर्व थिएटर्समध्ये शो रद्द करण्यात आल्याची माहिती वितरक अंकित चंदरामानी यांनी दिली. आज मुंबईत तीन ठिकाणी नाटकांचे प्रयोग होणार आहेत. बोरिवलीला ‘अनन्या’, ठाण्यात ‘हसवा फसवी’ आणि शिवाजी मंदीर दादर इथे ‘श्यामची आई’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. प्रयोग करण्याचा मानस कलाकारांचा आहे. पण या नाटकाला प्रेक्षक उपस्थिती बाबात मात्र सर्वत्र संभ्रम दिसतो.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget