Dia Mirza : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अभिनेते-अभिनेत्रींना सुरुवातच्या काळात रिजेक्शन अर्थात नकाराला सामोरे जावे लागते. अनेक अभिनेत्रींना आपल्या सुरुवातीच्या काळात रंग-रुप, वजन आदींमुळे नकार मिळाला. मात्र, एका अभिनेत्रीला सुंदर असूनदेखील नकाराला सामोरे जावे लागले. काही दिग्दर्शकांनी तिला तू अति सुंदर आहेस म्हणून नकार दिला. मात्र, या अभिनेत्रीला संधी मिळाल्यानंतर तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी 2001 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. आजपर्यंतच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने फक्त 4 हिट आणि 25 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. मात्र, त्यानंतरही ही अभिनेत्री आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. या अभिनेत्रीने मिस एशिया-पॅसिफिकचाही खिताब जिंकला आहे. या अभिनेत्रीला मिस इंडियाच्या खिताबाने मात्र, थोडक्यात हुलकावणी दिली होती.
सलग 12 चित्रपट फ्लॉप
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे दीया मिर्झा (Dia Mirza). दीया मिर्झा ही एका मीडिया फर्मसाठी मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करत होती. दीयाचे 12 चित्रपट सलग फ्लॉप झाले होते. 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातील गाणी गाजली होती. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही.
मिस एशिया पॅसिफिक खिताब विजेती
दीया मिर्झाने वर्ष 2000 मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी झाली होती. मात्र, विजयाने तिला हुलकावणी दिली. त्यानंतर दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकण्यास यशस्वी ठरली. विशेष म्हणजे हा खिताब 27 वर्षानंतर जिंकणारी भारतीय सौंदर्यवती ठरली.
एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?
चित्रपट फ्लॉप होत असले तरी दीया मिर्झा अजूनही सिनेइंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. एका वृत्तानुसार, दीया मिर्झा ही एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपयांचे मानधन घेते. त्याशिवाय, तिचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. दीया सिनेसृष्टीशिवाय पर्यावरण विषयक मुद्यावरही सक्रिय असते.