Bollywood Actor : भारतीय मनोरंजनसृष्टी (Bollywood) आणि क्रिकेट (Cricket) यांचं खूप चांगलं कनेक्शन आहे. दोन्ही क्षेत्र विभिन्न असले तरी एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. रुपेरी पडद्यावरही अनेक खेळ दाखवण्यात आले आहेत. लगान, 83 असो किंवा 'मेरीकॉम' आणि 'भाग मिल्का भाग'सारखे बायोपिक असो. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या रणवीर सिंह (Ranveer Singh), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडचा एक अभिनेता सिनेमात झळकण्यासोबत क्रीडाविश्वातही सक्रीय आहे. बॉलिवूडचा एक अभिनेता क्रिकेटचा मोठा चाहता आहे. क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबतही तो खेळला आहे. आज अभिनेता बॉलिवूडवर राज्य करताना दिसून येत आहे.
विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळणारा अभिनेता कोण?
विराट कोहलीसोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने बॉलिवूडसह ओटीटीविश्वातदेखील स्वत:चं नाव कमावलं आहे. हा अभिनेता म्हणजे साकिब सलीम (Saqib Saleem) आहे. आपल्या लूक आणि स्टाईलने अभिनेत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री हुमा कुरैशीचा भाऊ साकिब सलीमने अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. ग्लॅमरस जगात पाऊल ठेवण्यापूर्वी साकिब क्रिकेट खेळत असे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
साकिब जम्मू-काश्मिरकडून खेळला आहे. तसेच लहानपणी तो किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने स्वत:ला याबाबत खुलासा केला होता. साकिब सलीमने 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटाने अभिनेत्याला रातोरात सुपरस्टार केलं.
साकिबद्दल जाणून घ्या...
साकिबने 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटानंतर 'मेरे डॅड की मारुती','बॉम्बे टॉकीज','डिशूम',83' आणि 'रेस 3' सारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. चित्रपटांसह 'रंगबाज','क्रॅकडाऊन' सारख्या वेबसीरिजमध्येही अभिनेत्याची झलक पाहायला मिळाली आहे. साकिब अभिनयक्षेत्रासह सोशल मीडियावरदेखील सक्रीय आहे. दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा तो प्रयत्न करत असतो.
साकिबच्या वडिलांचे 10 रेस्टोरंट आहेत. दिल्लीत राहणाऱ्या साकिबने करिअरच्या सुरुवातीला क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. साकिबच्या वडिलांचे दिल्लीत अनेक रेस्टॉरंट आहेत. हॉटेलिंगमध्ये जम न बसवता आल्याने साकिबने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये त्याने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्याने मॉडेलिंगमध्ये आपला प्रवास सुरू केला.
चित्रपटांसह साकिब पुरुष क्रिकेट लीग, सेलिब्रिटी क्रिकेट लीग आणि मुंबई हीरोजसाठी क्रिकेट खेळताना दिसून येते. 'ढिशूम' या चित्रपटात अभिनेता दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळताना दिसून आला होता. रणवीर सिंहच्या 83 चित्रपटात तो मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत दिसून आला होता.
संबंधित बातम्या