Bollywood Most Iconic Movies : बॉलिवूडचे (Bollywood) अनेक चित्रपट (Movies) पुन्हा-पुन्हा पाहिले तरी त्यात गंमत वाटते. चित्रपट वारंवार पाहूनही तुम्हाला कंटाळा येत नाही. बॉलिवूडचे हे आयकॉनिक चित्रपट (Iconic Movies) वारंवार पाहावे असं तुम्हाला वाटत राहतं. अनेक वर्षानंतरही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. कोरोनाकाळानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या चित्रपट पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहे. पण त्याआधी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत होती. प्रेक्षकांची पाऊले थिएटरकडे घेऊन येणारं कथानक, तगडी स्टारकास्ट, हाडाचा दिग्दर्शक अशा सर्व गोष्टी होत्या. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत असे. जाणून घ्या बॉलिवूडच्या पाच आयकॉनिक चित्रपटांबद्दल...


'हे' आहेत बॉलिवूडचे 'TOP 5' आयकॉनिक चित्रपट (Top 5 Bollywood Iconic Movies)


1.) दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) : बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांचा विषय निघाला आणि 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे'चा विसर पडला असं होणं शक्यच नाही. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) अभिनीत हा रोमँटिक चित्रपट आजही अनेकांचा फेव्हरेट आहे. या चित्रपटातील 'जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी' हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झाला होता. राज आणि सिमरनची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.


2.) कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham) : 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल आणि हृतिक रोशन अशी तगडी स्टारकास्ट होती. 2001 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. कौटुंबिक नाट्य, विनोदी आणि एक गोड कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 


3.) मोहब्बतें (Mohabbatein) : 'मोहब्बतें' हा चित्रपट 2000 मध्ये रिलीज झाला. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 'मोहब्बतें'चं कथानक गुरुकुलचे मुख्याध्यापक नारायण यांच्यावर आधारित आहे. त्यांचा प्रेमावर विश्वास नाही. पुढे एका म्युझिक टीचरची एन्ट्री होते. म्युझिक टीचर मुलांना प्रेम करायला शिकवते. 


4.) 3 इडियट्स (3 Idiots) : आमिर खान आणि करीना कपूर स्टारर '3 इडियट्स' हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. '3 इडियट्स' हा ऑल इन वन चित्रपट आहे. या प्रेरणादायी चित्रपटात प्रेक्षकांना अटूट मैत्री आणि प्रेम पाहायला मिळेल.


5.) हेरा फेरी (Hera Pheri) : विनोदी चित्रपट पाहायला तुम्हाला आवडत असतील तर 'हेरा फेरी' हा चित्रपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत हा चित्रपट पाहताना तुम्हाला हसू येईल. 'हेरा फेरी'मध्ये परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसारखे कमाल कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...