Bollywood Actress Footwears Collection : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नेहमीच वेगवेगळ्या फुटवेअरमध्ये दिसून येतात. प्रत्येक इव्हेंटला त्यांनी परिधान केलेलं फुटवेअर लक्षवेधी असतं. त्यांच्या चपला, सँडल्स, शूजची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ असते. गुच्ची, डोर, वर्साचे सारख्या महागड्या ब्रँडचे फुटवेअर त्या परिधान करतात. अनेक अभिनेत्रींची घरात फुटवेअर कलेक्शनची विशेष खोली आहे. या यादीत करीना कपूर (Kareena Kapoor), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha), मलायका अरोरा (Malaika Arora) आणि गौरी खानसह (Gauri Khan) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्रींच्या फुटवेअर कलेक्शनमध्ये हजारो ते लाखो रुपयांच्या किंमतीचे 300 जोड्यांपेक्षा अधिक फुटवेअर उपलब्ध आहेत. 


करीना कपूर (Kareena Kapoor) : करीना कपूरला आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करायला आवडते. पण अभिनेत्रीच्या नव्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये आलिशान शूज कलेक्शन दिसून येत आहे. फोटो समोर आल्यानंतर चाहचे या फुटवेअरच्या किंमती विचारत आहेत. 






मलायका अरोरा (Malaika Arora) : मलायका अरोराला 'फॅशन आयकॉन' म्हटलं जातं. मलायकाला हिल्सची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीचं हील्स कलेक्शन पाहून चाहते हैराण होतील. हील्ससह अभिनेत्रीला महागड्या ब्राँडेड शूज आणि बुट्सची आवड आहे. 






परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) : परिणीती चोप्राला ब्रँडेड शूज खूप आवडतात. अनेकदा तिला महागड्या फुटवेअरमध्ये पाहिलेलं आहे. अभिनेत्रीने शूज ठेवण्यासाठी एक खास जागा ठेवली आहे. तसेच ते खराब होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित पॅक करुन ठेवलं आहे.






गौरी खान (Gauri Khan) : गौरी खानच्या घरी 'मन्नत'मध्ये एक ग्लासवाला एरिया फक्त तिचे शूज, हील्स, सँडल्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. तिचं फुटवेअर कलेक्शन पाहून चाहत्यांना एखाद्या ब्रँडेड शॉपची आठवण येईल.


नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) : अभिनेत्री नुसरत भरुचाचा मागील वर्षी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री फुटवेअरमध्ये बसलेली दिसून आली होती. नुसरतकडे 300 पेक्षा अधिक ब्रँडेड शूज, हिल्स, बूट्स, स्लिपर आहेत.