Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'आयपीएल 2024'मध्ये (IPL 2024) 'कोलकाता नाइट रायडर्स' (KKR) विजयी झाल्याने चर्चेत आहे. बॉलिवूड सुपरस्टारचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत त्याने 90 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या शानदार अदाकारीसाठी त्याला 14 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. शाहरुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शाहरुख खानचा मोठा संघर्ष आहे. किंग खान आज बॉलिवूडचा बादशाह आहे. सोशल मीडियावरही शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. शाहरुख खान कमाईच्या बाबतीत हॉलिवूड स्टार टॉम क्रूझलाही टक्कर देतो. आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचा मालक किंग खानच्या नेटवर्थबद्दल जाणून घ्या. शाहरुखची नेटवर्थ गेल्या एक दशकात 300 टक्क्यांनी वाढली आहे. चित्रपट, जाहिरात आणि उद्योगाच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो. नेटवर्थच्या बाबतीत तो सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानपेक्षा (Aamir Khan) आघाडीवर आहे.
शाहरुखचा शैक्षणिक प्रवास (Shah Rukh Khan Education)
शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. पाच वर्षांचा होईपर्यंत त्याचं बालपण आजी-आजोबांकडे गेलं. पुढे तो पुन्हा दिल्लीला आपल्या आई-वडिलांकडे आला. राजधानी सेंट कोंलबा शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेजमधून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने मुंबई गाठली.
शाहरुखची संपत्ती किती? (Shah Rukh Khan Net Worth)
लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती 760 मिलियन डॉलरच्या आसपास आहे. भारतीय चलनानुसार किंग खानची संपत्ती 6,324 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. शाहरुख खान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपयांचं मानधन घेतो. पण काही चित्रपट मात्र त्याने मोफत केलेले आहेत. शाहरुखकडे एक प्रायव्हेट जेट आहे. व्यवसाय, चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो. प्रत्येक दिवसाला तो 10 कोटींपेक्षा अधिक कमाई करतो. शाहरुखकडे महागडी प्रॉपर्टी आहे. मुंबईतील त्याच्या 'मन्नत' बंगल्याची किंमत 200 कोटी रुपये आहे. तसेच लंडन आणि दुबईत एक व्हिला आहे. अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे. शाहरुखने 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या चित्रपटांच्या माध्यमातून 2023 गाजवलं आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या