Panchayat 3 : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुप्रतीक्षित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या काही तासांत प्राईम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येणार आहे. मागील दोन्ही सीझनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्यामुळे तिसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही हे कलाकार लोकप्रिय आहेत. आता 'पंचायत 3'चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 


'पंचायत'च्या दोन्ही सीझनमध्ये फुलेरा गावाची आणि गावकऱ्यांची गोष्ट पाहायला मिळाली. आता तिसऱ्या सीझनमध्येही फुलेरा गावाला केंद्रीत करण्यात आले आहे. 'पंचायत 3' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि संविका हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. द वायरल फीवरने या सीरिजच्या प्रोडक्शनची धुरा सांभाळली आहे. दीपक कुमार मिश्राने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर चंदन कुमारने या सीरिजचं कथानक लिहिलं आहे. 


'पंचायत 3'मध्ये काय खास असणार? 


रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक दीपक मिश्रा म्हणाले की,"पंचायत 3' या सीरिजमधील कलाकार लोकांना माहिती आहेत. पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवं घडणार आहे. चंदन हा साधाभोळा मुलगा आहे हे लोकांना माहिती आहे. पण अचानक एखादी परिस्थिती उद्भवल्यानंतर तो याचा कसा सामना करणार हे या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. तर दुसरीकडे सचिव जी दिवसेंदिवस फसत चालला आहे. प्रधान जी आणि प्रहलाजचं वेगवेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक फ्रेश कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि तगडी स्टारकास्ट असं सर्व काही प्रेक्षकांना या सीरिजमध्ये एकत्रित पाहता येणार आहे. फुलेरा गावात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.






240 देशांत रिलीज होणार 'पंचायत 3' 


इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेला एक मुलगा उत्तर प्रदेशातील फुलेरा गावात ग्राम पंचायतीत सचिव म्हणून काम करायला सुरुवात करतो. त्यावेळी गावातील रीति-रिवाज आणि आयुष्यातील प्रवासावर या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. 'पंचायत 3' ही सीरिज 240 देशांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदीसह तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये ही सीरिज डब करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते. तिसऱ्या सीझननंतर चौथा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 


संबंधित बातम्या


OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...