जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असं जोधपूर सत्र न्यायालयात म्हटलं आहे. वकिलांनी सुनावणीनंतर याबाबत माहिती दिली. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.

लाईव्ह अपडेट




  • सलमानला आजही तुरुंगात रहावं लागणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

  • काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल यायला 20 वर्षे लागली, हा काळ शिक्षेपेक्षा कमी नाही : सलमानचे वकील

  • जप्त केलेली बंदूक जोधपूरमध्ये नव्हे, तर मुंबईत मिळाली, सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद

  • सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात

  • सलमानला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, बिष्णोई समाजाची मागणी, जोधपूर सत्र न्यायालयाबाहेर मोठी गर्दी

  • सलमानची केस न लढवण्यासाठी मेसेज आणि फोनद्वारे धमकी देण्यात आली, वकील महेश बोरा यांचा आरोप

  • प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर विश्वास नाही, सलमानच्या वकिलांचा दावा

  • सलमानचे वकील जोधपूर सत्र न्यायालयात पोहोचले, काही मिनिटात सुनावणीला सुरुवात

  • सलमानचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले, काही वेळातच जामिनावर निर्णय होणार

  • थोड्याच वेळात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होणार

  • न्यायाधीश रविंद्रकुमार सुनावणी करणार

  • कोर्टातील सुनावणीपूर्वी सलमानची वकिलांसोबत तुरुंगात तासभर चर्चा


सलमानचे वकील आज सकाळी तुरुंगात त्याला भेटले. दोघांमध्ये जामिनासंदर्भात तब्बल तासभर चर्चा झाली. सकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायालयाने काल 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने सलमानच्या जामिन अर्जावर निर्णय होऊ शकला नव्हता.

कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी क्रमांक 106 देण्यात आला आहे. जोधपूर तुरुंगात त्याने संपूर्ण रात्र काढली. चार चादरी घेऊन तो रात्रभर जमिनीवर झोपला. तुरुंगातलं जेवणही त्याने नाकारलं. सलमानला वरण, पत्ता गोबी आणि चपाती देण्यात आली, मात्र त्याने या जेवणाला नकार दिला.

तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत सलमानचा रक्तदाब वाढला होता, जो नंतर सामान्य झाला.

काळवीट शिकार

कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.

दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.

आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.

मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.

संबंधित बातम्या :

सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे?


निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!


...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!


काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड


सलमान ज्या तुरुंगात रात्र काढणार, त्याबद्दल ए टू झेड माहिती