एक्स्प्लोर

सलमान आजही तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असं जोधपूर सत्र न्यायालयात म्हटलं आहे. वकिलांनी सुनावणीनंतर याबाबत माहिती दिली. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.

जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असं जोधपूर सत्र न्यायालयात म्हटलं आहे. वकिलांनी सुनावणीनंतर याबाबत माहिती दिली. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.

लाईव्ह अपडेट

  • सलमानला आजही तुरुंगात रहावं लागणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी
  • काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल यायला 20 वर्षे लागली, हा काळ शिक्षेपेक्षा कमी नाही : सलमानचे वकील
  • जप्त केलेली बंदूक जोधपूरमध्ये नव्हे, तर मुंबईत मिळाली, सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद
  • सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात
  • सलमानला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, बिष्णोई समाजाची मागणी, जोधपूर सत्र न्यायालयाबाहेर मोठी गर्दी
  • सलमानची केस न लढवण्यासाठी मेसेज आणि फोनद्वारे धमकी देण्यात आली, वकील महेश बोरा यांचा आरोप
  • प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर विश्वास नाही, सलमानच्या वकिलांचा दावा
  • सलमानचे वकील जोधपूर सत्र न्यायालयात पोहोचले, काही मिनिटात सुनावणीला सुरुवात
  • सलमानचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले, काही वेळातच जामिनावर निर्णय होणार
  • थोड्याच वेळात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होणार
  • न्यायाधीश रविंद्रकुमार सुनावणी करणार
  • कोर्टातील सुनावणीपूर्वी सलमानची वकिलांसोबत तुरुंगात तासभर चर्चा
सलमानचे वकील आज सकाळी तुरुंगात त्याला भेटले. दोघांमध्ये जामिनासंदर्भात तब्बल तासभर चर्चा झाली. सकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायालयाने काल 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने सलमानच्या जामिन अर्जावर निर्णय होऊ शकला नव्हता. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी क्रमांक 106 देण्यात आला आहे. जोधपूर तुरुंगात त्याने संपूर्ण रात्र काढली. चार चादरी घेऊन तो रात्रभर जमिनीवर झोपला. तुरुंगातलं जेवणही त्याने नाकारलं. सलमानला वरण, पत्ता गोबी आणि चपाती देण्यात आली, मात्र त्याने या जेवणाला नकार दिला. तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत सलमानचा रक्तदाब वाढला होता, जो नंतर सामान्य झाला. काळवीट शिकार कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे. दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते. आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं. मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं. संबंधित बातम्या :

सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे?

निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!

...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!

काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड

सलमान ज्या तुरुंगात रात्र काढणार, त्याबद्दल ए टू झेड माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
धक्कादायक! प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrashant Koratkar Dubai : प्रशांत कोरटकर दुबईत पळाला? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण ABP MAJHANashik Kidnapping Case : प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेचं केलं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
धक्कादायक! प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
Embed widget