एक्स्प्लोर
VIDEO : दहीहंडी कार्यक्रमात नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली

बुलडाणा : एकीकडे भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी बेताल वक्तव्य केलं असतानाच बुलडाण्यातूनही एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मालिका आणि चित्रपटात गाजलेली अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. आशीर्वाद मेडिकल समोरील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेहा स्टेजवर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे साहजिकच नेहाला संताप अनावर झाला. धक्काबुक्कीनंतरचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात नेहा प्रचंड चिडलेली दिसत आहे. एक महिला पदाधिकारी नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना, नेहाने मात्र संतापून तिच्यासमोर हात जोडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेहाने या प्रकरणी आयोजकांना सुनावलं आणि रागारागात निघून गेली.
VIDEO : दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की https://t.co/ryrk831Wf2 … @NehhaPendse #NehhaPendse pic.twitter.com/ZhME1qVKyF
— ABP माझा (@abpmajhatv) September 5, 2018
आणखी वाचा























