Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2020 मध्ये ती पती करण सिंग ग्रोव्हरसोबत 'डेंजरस' वेब सिरिजमध्ये दिसली होती, परंतु ही वेब सिरिजही फारशी चर्चेत नव्हती. बिपाशाने मोठ्या पडद्यापासून आणि अभिनयापासून स्वतःला का दूर केले आहे? हे बिपाशाच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. बिपाशाने स्वत:च चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना बिपाशा म्हणाली की , 'मी आळशी झाले होते आणि गेल्या काही वर्षांपासून काम करत नव्हते. परंतु, 2022 मध्ये कामावर परतणार आहे. मी काहीतरी मनोरंजक करेन. मला आशा आहे की याची लवकरच एक घोषणा होईल.
''जग कुठे चालले आहे हे मला माहीत नव्हते, कारण कोरोना व्हायरसने सर्वांना घरीच राहावे लागले. त्यावेळची परिस्थिती भयानक होती. अशी परिस्थिती आपण कोणीच यापूर्वी अनुभवली नव्हती. मी पण बर्याच भावनांमधून गेले आहे. या काळात मी आणि माझा पती करण साध्या-साध्या गोष्टींचा आनंद लुटत होतो, असे बिपाशाने सांगितले.
दरम्यान, बिपाशा आता इंडस्ट्रीमध्ये परतण्यासाठी तयार झाली आहे. एवढेच नाही तर तिचा दृष्टिकोनही खूप बदलला आहे. याबाबत बोलताना बिपाशा सांगते, 'आता मी खूप काम करायला पूर्णपणे तयार आहे. मी इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Allu Arjun Sneha Reddy Wedding Anniversary : अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस
- One Four Three : प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या 'वन फोर थ्री'चा सिनेमागृहात कल्ला
- 83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
- Nagraj Manjule : 'झुंड'च्या यशानंतर नागराज मंजुळे लवकरच मिस्टर परफेक्शनिस्टसोबत करणार काम? आमिर खानदेखील आहे तयार