Allu Arjun Sneha Reddy Anniversary : अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा आणि त्यांची दोन मुले अयान आणि अरहादेखील दिसत आहेत. 


अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अल्लू अर्जुन आणि स्नेहा 11 मार्च 2011 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. अल्लू अर्जुन आणि स्नेहाची प्रेमकहाणी फिल्मी आहे. अल्लू आणि स्नेहाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंड्ने घडवून आणली होती.






पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन पुन्हा फहद फासिल आणि रश्मिका मंदान्नासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.


संबंधित बातम्या


One Four Three : प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या 'वन फोर थ्री'चा सिनेमागृहात कल्ला


83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


Nagraj Manjule : 'झुंड'च्या यशानंतर नागराज मंजुळे लवकरच मिस्टर परफेक्शनिस्टसोबत करणार काम? आमिर खानदेखील आहे तयार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha