TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच


4 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड'रिलीज झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा व्यवसाय केला आहे.


अभिनय नाही तर ‘या’ माध्यमातून आर्यन खान करणार बॉलिवूड डेब्यू


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाचे लोक दिवाने आहेत. पण, त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला अभिनेता बनण्यात अजिबात रस नसल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आर्यन खानला वडिलांपेक्षा वेगळे काहीतरी करून नाव कमवायचे आहे. किंग खानने एकदा खुलासा केला की, आर्यनला अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात जास्त रस आहे, जे तो शिकला देखील आहे.


'83'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


रणवीर सिंहचा '83' सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे.  20 मार्चला रविवारी रात्री आठ वाजता स्टार गोल्डवर '83' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. '83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.


'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले


 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले. 


‘कच्चा बदाम’नंतर  भुवन बड्याकरचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


भुवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याने आता एक नवीन गाणे बनवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने हे गाणे त्याच्या अपघातावर तयार केले आहे. त्यांनी या गाण्याचे नाव ठेवले आहे- 'आमर नूतन गोरी'. याचा अर्थ- 'माझी नवीन गाडी.' भुवनने त्याच्या नवीन गाण्यात त्याची नवीन कार आणि अपघात याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.


जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज


बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या 'अटॅक' सिनेमाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 7 मार्च 2022 रोजी आऊट होणार आहे. तर सिनेमा 1 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Ajunahi Barsaat Aahe : 'अजूनही बरसात आहे' मालिका घेणार निरोप, मनूची भावूक पोस्ट व्हायरल


Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ


Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा', स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha