One Four Three : प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या 'वन फोर थ्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मधु आणि विशुची प्रेमकहाणी रेखाटणारा हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरत आहे. रोमँटिक आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित हा सिनेमा 4 मार्चपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 


दोन दिवसात या सिनेमाने सिनेमागृहात चांगलीच बाजी मारली आहे. मराठवाडा, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, नाशिक या भागात सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. तर पुण्यातील काही भागात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला आहे. 'हे आपलं काळीज हाय' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.





'वन फोर थ्री' सिनेमाचे दिग्दर्शन योगेश भोसलेने केले आहे. तर योगेश भोसले आणि शीतल अहिरराव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 'वन फोर थ्री' सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Ajunahi Barsaat Aahe : 'अजूनही बरसात आहे' मालिका घेणार निरोप, मनूची भावूक पोस्ट व्हायरल


Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा', स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha