Nagraj Manjule : सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'झुंड' (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांसह समीक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'झुंड' सिनेमानंतर आता नागराज मंजुळेंनी बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानसोबत (Aamir Khan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणाले की, आमिर खानने 'झुंड' सिनेमाचे कौतुक केले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आमिरने सिनेमातील कलाकारांचीदेखील भेट घेतली. मला खूप दिवसांपासून आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. तसेच मी यावर गांभीर्याने विचार करत आहे.
‘झुंड’या सिनेमाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. 'झुंड' सिनेमाची स्क्रिप्ट आमिरने ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की, अमिताभ बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते या भूमिकेसाठी कसे योग्य आहेत, हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.
संबंधित बातम्या
Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ
The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर
Attack New Poster : जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, ट्रेलर 'या' दिवशी होणार आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha