बिग बॉस 14 चे निर्माते प्रेक्षकांना शोमध्ये बांधून ठेवण्यासाठी दररोज नवीन ट्विस्ट आणत आहेत. अलीकडेच या हंगामात जुने स्पर्धक विकास गुप्ता, अर्शी खान, राहुल महाजन आणि काश्मिरा शाह यांना चँलेंजर्स म्हणून एन्ट्री देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत स्पर्धक निक्की तांबोळी आणि अली गोनी यांच्यासह बिग बॉसच्या घरात येताच शो आणखी रंजक झाला आहे. या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर, आज दाखवलेल्या वीकेंड वॉरच्या एपिसोडमध्ये सलमान खान रागवताना दिसणार आहे.

Continues below advertisement

अर्शीच्या विनोदा वर सलमानला रागवला

बिग बॉस वीकेंडचा एपिसोड सुरू झाल्यावर सलमान खान अर्शी खानच्या विनोदावर रागावला असल्याचे प्रोमोमध्ये दाखवले आहे. यावेळी अर्शी होस्ट सलमान खानला म्हणाली की आता तुम्ही आम्हाला लाडू खाऊ घाला. सलमानला हे आवडत नाही आणि तो अर्शीला सांगतो की त्याला तिच्याशी बोलायचे नाही.

Continues below advertisement

कविता कौशिक आणि रुबीना दिलैकमध्ये वॉर

प्रोमोचा दुसरा भाग प्रत्येकासाठी अत्यंत मनोरंजक आहे. आगामी भागांमध्ये रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला जुना स्पर्धक कविता कौशिक आणि तिचा नवरा रोहित विश्वास यांच्याशी शुक्लावरील आरोपांबद्दल फेस टू फेस चर्चा करतील. प्रोमोमध्ये रुबीना कवितावर ओरडली आणि म्हणाली, "तुझ्या अनुपस्थितीत तुझा नवरा माझ्या पतीसाठी बोलला आहे."

रोहित पुढे म्हणतो की कविताने त्याला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितले होते आणि आपल्या व्हायलेंट मेसेजबद्दलही सांगितले होते. यावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिक यांच्यात बरीच चर्चा आहे. नंतर होस्ट सलमान खान मधे येतो आणि तीव्र नाराजी व्यक्त करतो. तो म्हणतो की हे खूप घाणेरडे आहे. नुकत्याच दाखवल्या गेलेल्या भागात विकास गुप्ता अभिनव शुक्लाला सांगतो की कविता कौशिकने सोशल मीडियावर त्याच्यावर काही आरोप केले आहेत. यावर अभिनव बराच चिडला आहे. तो रुबीनाला याबद्दलही सांगतो. यानंतर रुबीना म्हणते की ती कविताला धडा शिकवणार.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Arya Banerjee Death: 'द डर्टी पिक्चर' मधील अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू

इंदू की ताणलेली जवानी!!