एक्स्प्लोर
जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमाचा टीझर भारतीय
‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक प्रादेशिक सिनेमा सिनेरसिकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता मेहश बाबूचा आगामी ‘भारत एएन नेनू’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, या टीझरने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

नवी दिल्ली : एकेकाळी सिनेजगतातील सर्व विक्रम हॉलीवूडच्या नावावर असायचे. पण आता भारतीय सिनेमातील कंटेन्टमुळे सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे, यात हिंदी सिनेमांऐवजी प्रादेशिक सिनेमे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचं समोर येत आहे. ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक प्रादेशिक सिनेमा सिनेरसिकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता मेहश बाबूचा आगामी ‘भारत एएन नेनू’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, या टीझरने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. बाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “जवळपास 6 लाख 40 हजार लाईक्स. महेश बाबूचा भारत एएन नेनू चा टीझर जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला दुसरा टीझर ठरला आहे.” सध्या महेश बाबूचे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात चाहते आहेत. आगामी भारत एएन नेनू सिनेमात तो एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमाचा टीझर पाहा
Before You Go
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

नरेंद्र बंडबे
Opinion





















