एक्स्प्लोर
या लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?
इन्स्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर करत 46 वर्षीय अभिनेता राम कपूरने चाहत्यांना अवाक केलं.

मुंबई : फोटोमध्ये दिसणारा अभिनेता तुम्हाला ओळखीचा वाटतो का? बडे अच्छे लगते है, कसम से यासारख्या मालिकांमुळे लोकप्रिय झालेला हा अभिनेता राम कपूर आहे. राम कपूरचं ट्रान्सफॉर्मेशन ओळखण्यापलिकडचं आहे.
इन्स्टाग्रामवर आपले नवे फोटो पोस्ट करुन 46 वर्षीय रामने चाहत्यांना अवाक केलं. या फोटोमध्ये रामने बरंच वजन कमी केल्याचं दिसत आहे. तर त्याचे केसही चंदेरी रंगाचे दिसत आहेत.
'काय म्हणता लोकांनो, खूप दिवसांनी...' अशा आशयाचं कॅप्शन राम कपूरने फोटोला दिलं आहे. रामची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री गौतमी गाडगीळ-कपूर हिनेही त्यावर 'हॉटी' अशी कमेंट केली आहे.
2006 साली कसम से या मालिकेने राम घराघरात पोहचला. 2011 मध्ये आलेल्या बडे अच्छे लगते है मालिकेतील भूमिकेमुळेही त्याला पुन्हा लोकप्रियता मिळाली. उडान, हमशकल्स, मेरे डॅड की मारुती, एजंट विनोद सारख्या सिनेमांमध्येही तो दरम्यानच्या काळात झळकला.
यापूर्वी, म्हणजे 2017 मध्ये रामने जिममधले वर्कआऊट करतानाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता रामचं दिसत असलेलं रुप अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तरुण दिसण्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी आपण बारीक होत असल्याचं रामने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मुलीसाठी त्याने धूम्रपानही सोडलं होतं. 1997 साली 'न्याय' मालिकेतून रामने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर हीना, कविता यासारख्या मालिकांमध्येही तो झळकला. मात्र त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती 'घर एक मंदिर' मालिकेतून. त्यानंतर धडकन, हजारों ख्वाहिशें ऐसी यासारख्या चित्रपटांत तो दिसला.View this post on Instagram

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
