Bad Newz : हिंदी चित्रपटासाठी विकी कौशलची मराठीत साद, कसं काय पुणेकर? विचारत पुणेकरांशी मराठीतून संवाद
Vicky Kaushal's Marathi Interaction with Fans : विकी कौशलच्या ‘बॅड न्युज’ या आगामी चित्रपटाचं पुण्यामध्ये प्रमोशन पार पडलं. यावेळी विकीनेही पुणेकरांसोबत मराठीत संवाद साधला.
![Bad Newz : हिंदी चित्रपटासाठी विकी कौशलची मराठीत साद, कसं काय पुणेकर? विचारत पुणेकरांशी मराठीतून संवाद Bad Newz Vicky Kaushal interacted with Punekar in Marathi while promotion in pune Tripti Dimri Ammy virk marathi news Bad Newz : हिंदी चित्रपटासाठी विकी कौशलची मराठीत साद, कसं काय पुणेकर? विचारत पुणेकरांशी मराठीतून संवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/23c0ec7b1fe2fea4743d8adc695f38131719642922444544_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bad Newz Pune Promotions : अभिनेता विकी कौशल (Bollywood Actor Vicky Kaushal) सध्या त्याच्या आगामी बॅड न्यूज (Bad Newz) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दौरा पुणे शहरातून सुरु झाला. “कसं काय? कसंय? लय भारी”, असं विकी कौशल मराठीत बोलताच पुणेकरांचा कमाल प्रतिसाद पाहायला मिळाला. नुकतंच पुणेकरांनी विकी कौशलसोबत मराठीमध्ये संवाद साधला. विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटाचं पुण्यामध्ये प्रमोशन पार पडलं. यावेळी विकीनेही पुणेकरांसोबत मराठीत संवाद साधला.
विक्की कौशलचा पुणेरी अंदाज
धर्मा प्रॉडक्शन्स आणि लिओ मीडिया कलेक्टिव या दोन प्रॉडक्शन कंपनीचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘बॅड न्यूज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटात विक्की कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क हे मूख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बॅड न्यूज’ हा कॉमेडीपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या टीम आता सर्व शहरांमध्ये प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुणे शहरापासून झाली.
कसं काय पुणेकर? विचारत पुणेकरांशी मराठीतून संवाद
चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पुणेकरांसोबत आणि पत्रकारांसोबत विक्की कौशलने दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याने म्हटलं की, “पुण्यात आल्यावर त्याला नेहमी आनंद होतो, पुणेकरांकडून खूप प्रेम मिळतं, त्यामुळे पुणे शहराविषयी एक विशेष अशी ओढ वाटते आणि प्रमोशनची सुरुवात देखील पुण्यातून झाली याचा आनंद आहे. हा कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे कुटुंबासोबत तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता”, असं देखील विक्की कौशलने म्हटलं आहे.
‘बॅड न्यूज’ चित्रपटाचं पुण्यामध्ये प्रमोशन
‘बॅड न्यूज’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. विकीच्या या कॉमेडी चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं समोर आलं होतं. या गाण्यानेही सर्वांना वेड लावलं आहे. तौबा तौबा गाण्यावरील विकी कौशलच्या डान्स मूव्हने चाहत्यांना चांगलीच भूरळ पाडली आहे. या गाण्यातील विकीचा डॅशिंग लूक पाहता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Tauba Tauba : भाईजानकडून कतरिनाच्या Hubby चं कौतुक, तौबा तौबा गाण्यावरील विकी कौशलचा डान्स पाहून शेअर केली खास पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)