एक्स्प्लोर

मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल

नवी दिल्ली : मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याची जळजळीत टीका केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली आहे. चित्रपटाबाबतचा निर्णय प्रेक्षकांना घेऊ द्या असं आवाहनही सुप्रियोंनी केलं आहे. 'मनसे हा गुंडांचा पक्ष आहे, मनसेने कायदा हातात घ्यायला नको, 'ऐ दिल है मुश्कील' हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांना निर्णय घेऊ द्या' असं सुप्रियो म्हणाले. 'ऐ दिल है मुश्कील'ची मुश्कील वाढल्यानं प्रोड्युसर्स असोसिएशननं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडं घातलं. दिग्दर्शक मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर, विजय सिंह, अपूर्व मेहता या निर्माता दिग्दर्शकांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी बाबुल सुप्रियोसुद्धा उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी 'ऐ दिल है मुश्किल'ला पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्याचं मुकेश भट यांनी सांगितलं आहे. मनसेचा इशारा : मल्टिप्लेक्स चालकांनी पाक कलाकारांचे चित्रपट दाखवल्यास मनसेची कामगार संघटना कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे. करण जोहरच्या विनंतीला मनसेनं कचऱ्याची टोपली दाखवली. आधी चले जावची हाक देऊन तोडफोडीचा इशारा दिलेल्या मनसेनं आता असहकार पुकारला आहे. जर मल्टिप्लेक्समध्ये ‘ऐ दिल है मुश्कील’ प्रदर्शित केला तर मनसेची कर्मचारी संघटना कामबंद आंदोलन करेल अशी घोषणा मनसेनं केली आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निवलसह इतर सिनेमा थिएटर्समध्ये 70 टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळे मनसे कर्मचारी संघटनेनं संप पुकारला तर थिएटर्स चालणं मुश्कील होईल चित्रपट प्रदर्शित करु द्या “ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही”, अशी विनंती करण जोहरने केली होती. उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार असलेले “ऐ दिल है मुश्किल” आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. तसंच मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासही सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर करण जोहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. करणची पोलिस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केल्यानंतर दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने पोलिसात धाव घेतली होती. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे करणने सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन मुंबई पोलिसांनी दिलं आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या टीमने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट, फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलच्या अनुपमा चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते. मल्टिप्लेक्सच्या काचा महागड्या असतात ‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे. मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा दमही मनसेने भरला आहे. ऐ दिल है मुश्किलचा वाद काय आहे? ‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या :

'ऐ दिल..'च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी

मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात

माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका

यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप

पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…

‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत

‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा

पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget