Dream Girl Release Date : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) या सिनेमाचा समावेश आहे. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट जाणून घ्या... (Dream Girl 2 Release Date)
'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) हा सिनेमा आधी 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आयुष्मानने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना 'ड्रीम गर्ल 2'च्या रिलीज डेटबद्दल माहिती दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझे प्रियजन... आता चार वर्षांनी मी तुमच्या भेटीला येत आहे. तर माझी एन्ट्री दिमाखदार असायला हवी ना? थोडी प्रतीक्षा करा..आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम असच राहो".
View this post on Instagram
आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लक्षवेधी कमेंट्स केल्या आहेत. आणखी प्रतीक्षा करावी लागणार, आम्ही 7 जुलैची वाट पाहत होतो आणि तुम्ही रिलीज डेट पुढे ढकलली, काय झालं आयुष्मान भावा? रिलीज डेट पुढे का ढकलली? आम्हाला तुझी आठवण येत आहे. आमचं मनोरंजन तुझ्यासारखं कोणी करू शकत नाही, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा विनोदी असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. राज शांडील्य दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती बालाजी टेलीफिल्म्सच्या बॅनरअंतर्गत होत आहे.
'ड्रीम गर्ल 2' या सिनेमाबद्दल एकता कपूर (Ekta Kapoor) म्हणाल्या,"ड्रीम गर्ल 2' या सिनेमात पूजाची भूमिका आयुष्मानने चोख पार पाडावा अशी आमची इच्छा आहे. या सिनेमाच्या वीएफक्ससह इतर गोष्टींवर आम्ही खूप मेहनत घेत आहोत".
संबंधित बातम्या