मुंबई : पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीची हत्या आणि बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेविरोधात देशभरात आक्रोश पाहायला मिळत आहे. याचा निषेध करत डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात याचा निषेध होत असतानाच बॉलिवूड कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया मांडली आहे. अभिनेता आयुष्मान खुराना याने कोलकाता निर्भया कांडवर कविता लिहिली आहे.


कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर आयुष्मान खुरानाची कविता


आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आयुष्मानने इंस्टाग्रामवर कवितेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावरील कवितेचे बोलं 'काश! मैं भी लड़का होती' असे आहेत. आयुष्मानच्या या कवितेचा प्रत्येक शब्द मनाला बोचून जाणार आहे. आयुष्मानची ही कविता ऐकल्यावर तुमचंही मन सुन्न होऊन डोळ्यातून पाणी येईल.


एक-एक शब्द ऐकून अंगावर येईल काटा


कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. देशवासीयांचा संताप उफाळून येत असून अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, अभिनेता आयुष्मान खुरानाची एक कविता चर्चेत आहे, जी ऐकून तुमचंही मन सुन्न होईल. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेच्या पार्श्वभूमीवर आयुष्मानने एक कविता लिहिली आहे. 


आयुष्मान खुरानाच्या कवितेचे बोल पुढीलप्रमाणे आहेत.


काश मैं भी लड़का होती


मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती।
झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती, काश मैं भी लड़की होती।


कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ-लिखाओ सशक्त बनाओ।
और जब पढ़-लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती,
काश मैं भी लड़का होती।


36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ।
काश! उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती।
काश मैं ही लड़का होती।


कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता।
एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती?
काश में एक लड़का होती।
अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती।




महत्त्वाच्या इतर बातम्या


Bigg Boss Marathi 5 : निक्की आणि अरबाजमध्ये उडतायत खटके, पण नेमकं कारण कोण? मित्रचं ठरणार वैरी?