Auron Mein Kahan Dum Tha Release Date: 'औरों में कहां दम था' ची रिलीज डेट जाहीर; अजय देवगण आणि तब्बू चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका
अजय देवगण आणि तब्बू हे 'औरों में कहां दम था' (Auron Mein Kahan Dum Tha) या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.
![Auron Mein Kahan Dum Tha Release Date: 'औरों में कहां दम था' ची रिलीज डेट जाहीर; अजय देवगण आणि तब्बू चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका Auron Mein Kahan Dum Tha Release Date out ajay devgn and tabu film release announcement Auron Mein Kahan Dum Tha Release Date: 'औरों में कहां दम था' ची रिलीज डेट जाहीर; अजय देवगण आणि तब्बू चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/41a6b076b0ae446a3f42ba9c87347d091701783867176259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Auron Mein Kahan Dum Tha Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay devgn) आणि अभिनेत्री तब्बू (Tabu) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रेक्षकांना अजय आणि तब्बूची जोडी खूप आवडते. तब्बू आणि अजय हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हे दोघे 'औरों में कहां दम था' (Auron Mein Kahan Dum Tha) या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.
कधी रिलीज होणार 'औरों में कहाँ दम था'? (Auron Mein Kahan Dum Tha)
नीरज पांडे यांच्या आगामी 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू हे काम करणार आहेत. नीरज पांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजय आणि तब्बूचा हा चित्रपट पुढील वर्षी 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
अजयनं 5 डिसेंबर रोजी ट्विटरवर पोस्ट शेअर करुन 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची घोषणा केली होती - "मी नीरज पांडे यांच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची घोषणा करत आहे."
'हे' कलाकार औरों में कहाँ दम था' मध्ये करणार काम
चित्रपटाच्या प्रदर्शनाची जरी तारीख जाहीर झाली असली तरी चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी सारखे दिग्गज कलाकार और में कहा दम था या चित्रपटामध्ये काम करणार आहेत.
Announcing the release date of my collaboration with Neeraj Pandey 🤝 - Auron Mein Kahan Dum Tha, on April 26th.@neerajpofficial @ShitalBhatiaFFW #Tabu @mmkeeravaani #NarendraHirawat #KumarMangatPathak @FFW_Official @nh_studioz @PanoramaMovies pic.twitter.com/7ysXSIqcXS
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 5, 2023
दृष्यम, दृष्यम-2, दे दे प्यार दे या चित्रपटांमध्ये तब्बू आणि अजय देवगणनं काम केलं आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)