Article 370 OTT Release : लोकसभा मतदानाचा पहिला टप्पा अन् त्याच दिवशी 'आर्टिकल 370' ओटीटीवर येणार? 'या' प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार सिनेमा
Article 370 OTT Release : आर्टिकल 370 या चित्रपटात यामी गौतमी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Article 370 OTT Release : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजले आहे. अवघ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यातच सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी देखील केली जातेय. अशातच देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारे सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातलाच आर्टिकल - 370 (Article 370) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच आता हा सिनेमा ओटीटीवरही रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी सुरु होणार आहे. त्याच दिवशी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आर्टिकल 370 या चित्रपटात यामी गौतमी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु होती. त्यातच आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यात आलीये. आदित्य सुहास जांभळे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बी६२ स्टुडिओ आणि जिओ स्टुडिओज लोकेश धर, आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीये.
'या' प्लॅटफॉर्मवर चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आजच्या दिवशीही आर्टिकल-370 हा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. पण आता हा सिनेमा ओटीटीवरही रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता निर्माण झाली होती. 19 एप्रिल २०२४ पासून ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकांचा पहिलाच टप्पा
शनिवारी केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानुसार देशात सात टप्प्यात मतदानाचा प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी सुरु होणार आहे. तसेच 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
यामी गौतमीसह चित्रपटात हे कलाकार
या चित्रपटात यामी गौतमसह प्रियमणी, अरुण गोविल आणि किरण करमरकर यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे या चित्रपटात यामीने एका एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.