Anushka Sharma And Virat Kohli: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा होणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता विरुष्का बेंगळुरू येथे स्पॉट झाले आहेत. बेंगळुरू येथील अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 


विरुष्काचा व्हिडीओ व्हायरल (Anushka Sharma And Virat Kohli Video)


विरुष्काच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का ही विराटसोबत हॉटेलबाहेर फिरताना दिसत आहे. विराटने तिचा हात पकडला आहे, असंही दिसत आहे. अनुष्कानं काळ्या रंगाचा शॉर्ट फ्लेर्ड ड्रेस घातला आहे .ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे मत आहे. विरुष्काच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


अनुष्का आणि विराटच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "अनुष्का प्रेग्नंट आहे?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "ज्युनिअर विराट येणार आहे, अनुष्का प्रेग्नंट आहे."






अनुष्का आणि विराट यांना  काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण तेव्हा दोघांनीही पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत, असंही त्यांनी त्यावेळी सांगितले होतं. याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगामन होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.


2017 मध्ये अनुष्कानं विराटसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका (Vamika Kohli) असं आहे.  विराट आणि अनुष्का हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनुष्का आणि विराट हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. पण याबाबत विराट आणि अनुष्कानं अजुन कोणतीही माहिती दिली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?