मुंबई : विरुष्का अर्थात विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांची जोडी म्हणजे एक हिट जोडी समजली जाते. या दोघांनी आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ज्या पद्धतीने सांभाळलंय ते पाहून अनेकांना हेवा वाटतो. आपल्या वेगवेगळ्या अदाकारीने चर्चेत असणारी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये विराटने अनुष्काचा दुपट्टा ओढल्याचं आणि त्यावर अनुष्कानेही वेगळं एक्सप्रेशन दिल्याचं दिसत आहे. 


जहीर-सागरिकाच्या लग्नामध्ये विराट-अनुष्काची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. त्यावेळी या दोघांनी चांगलीच दंगा-मस्ती केली होती. विराटने अनुष्काचा दुपट्टा ओढला आणि त्याने थिरकायला सुरुवात केली. त्यावर अनुष्कानेही वेगवेगळे एक्सप्रेशन दिले आहेत. यावेळी उपस्थितांनी या जोडीच्या अदाकारीला दाद दिली. विरुष्काच्या या फोटोतील अदावर चाहते घायाळ झाले असून सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 


 






या दोघांचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. विरुष्काचा नोव्हेंबर 2017 सालचा ब्लॅक आणि व्हाईट फोटो त्यांच्या चाहत्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.


काही महिन्यांपूर्वीच अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव वामिका ठेवण्यात आलं आहे. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी इंग्लंमध्ये आहे आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. 


संबंधित बातम्या :