घराच्या बाल्कनीतून अथांग समुद्र दिसतो तर आत राजवाड्यासारखी फिलींग; अनुष्का आणि विराटचे स्वप्नातील घर पाहा

संपादित छायाचित्र

1/8
अनेकदा चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. ते कुठे राहतात, त्यांचे घर कसे आहे, ते कोणत्या प्रकारचे जीवन जगतात इ. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांचीही खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे, तर मग आज आपण त्यांच्या घराची सफर करू. विराट आणि अनुष्काचे घर किती आलिशान आहे हे काही फोटोमधून दिसेल (फोटो - सोशल मीडिया)
2/8
विराट आणि अनुष्का यांचे घर मुंबईतील वरळी भागात एका उत्तम ठिकाणी बनले आहे. हे घर अनुष्का आणि विराटने वर्ष 2016 मध्ये एकत्र खरेदी केले होते. 2017 मध्ये लग्नानंतर ते या सुंदर महालासारख्या घरात शिफ्ट झाले. (फोटो - सोशल मीडिया)
3/8
प्रत्येक खास प्रसंगी विराट आणि अनुष्काच्या या घराची झलक दिसते. जे प्रत्येक कोपऱ्यातून सुंदर दिसते. त्यांचे स्वप्नातील घर 35 व्या मजल्यावर आहे, तेथून मायानगरीचे सौंदर्य अधिकच लोभस दिसते. (फोटो - सोशल मीडिया)
4/8
या घराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बाल्कनी आहे, जिथून विशाल समुद्र स्पष्ट दिसत आहे. जिथून विराट आणि अनुष्का अनेकदा आपली सुंदर फोटो शेअर करतात. (फोटो - सोशल मीडिया)
5/8
बाल्कनीमध्ये जिथे हे जोडपे बऱ्याचदा फोटो सेशन्स करतात, तिथे अनुष्काने एक वेगळंच जग सेट केलं आहे. ती बर्‍याचदा येथे बागकाम करताना दिसली. (फोटो - सोशल मीडिया)
6/8
विराट-अनुष्काच्या या घरात खासगी टेरेस आहे, जिथे दोघे बराच वेळ घालवतात आणि आपल्या चाहत्यांसमवेत फोटो शेअर करतात. अनुष्काने कोजागिरी पौर्णिमेला हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
7/8
अनुष्का अभिनेत्री असल्याने तिला फोटो सेशनपासून मुलाखतीपर्यंत सर्व आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अनुष्काने तिच्या घरी एक कोपरा डिझाइन केला आहे, जिथे ती प्रत्येक व्यावसायिक फोटोशूट करताना दिसते. (फोटो - सोशल मीडिया)
8/8
या 4 बेडरूमच्या विरुष्काच्या घराचे कार्पेट क्षेत्र सात हजार चौरस फूट आहे. याची किंमत ऐकून आपल्या मनात धडकी भरेल. या घराची किंमत मीडिया रिपोर्टमध्ये 34 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Sponsored Links by Taboola