Anurag Kashyap : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा कोणत्या ना कोणत्यातरी कारणामुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे सिनेमे जितके प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात तितकच त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे अनुराग बऱ्याचदा समोर येतो. सध्या त्याने केलेल्या अशाच एका सोसळ मीडियाच्या पोस्टमुळे अनुराग चर्चेचा विषय ठरला आहे. पण अनुरागसोबत जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला पैसे मोजावे लागतील. 


अनुरागची हीच इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलीये. दरम्यान त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या या निर्णयाची खिल्ली देखील उडवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अनुरागने हा निर्णय खरचं घेतला आहे की यामध्ये वेगळं काही तरी आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल. पण अनुरागने आता केलेल्या पोस्टवरुन जर तुम्ही अनुरागला भेटायला जाणार असाल तर तुम्हाला 10 मिनिटांसाठी 1 लाख, अर्ध्या तासासाठी 1.5 लाख रुपये आणि एका तासासाठी 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. 


अनुरागने नेमकं काय म्हटलं?


आतापर्यंत मी माझा बराच वेळ नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी खर्च केला आहे. त्यामुळे मी आता यापुढे माझा वेळ कोणत्याही ऐऱ्यागैऱ्याला ज्यांना असं वाटतं की ते कलाकार आहेत त्यांना भेटण्यात वाया घालवणार नाही. पण तरीही तुम्हाला मला भेटायचं असेल तर त्यासाठी मी आता पैसे चार्ज करणार आहे. जर कोणाला मला भेटायचं असेल त्यांनी मला 10 मिनिटांचे 1 लाख, अर्ध्या तासाचे 1.5 लाख आणि 1 तासाचे पाच लाख रुपये घेतले जातील. लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवणं या गोष्टीला मी आता कंटाळलो आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही इतके पैसे देऊ शकता तर मला संपर्क करा नाहीतर दूरच रहा. तसेच हे सगळे पैसे अॅडव्हान्स घेतले जातील, अशी पोस्ट अनुरागने केली आहे. 






अनुरागच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


दरम्यान अनुरागच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्याच्या या पोस्टची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये एकानं म्हटलं की, सर मी तुमच्या दारावरची बेल वाजवणारच होतो. तर एकानं म्हटलं की, ठिक आहे मला तुम्हाला भेटून झाल्यानं बाहेर पडायचे मी पैसे घेईन. एकाने तर याची तुलना थेट ओरीसोबत केलीये. पण अनुराग आता खरंच लोकांना भेटण्यासाठी पैसे घेणार का हे उत्सुकतेचं असेल. 


ही बातमी वाचा : 


Abhishek Bachchan to join Politics : बच्चन कुटुंबातील आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाणार? अभिषेकच्या राजकारणातल्या एन्ट्रीच्या चर्चा, 'या' पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता