Abhishek Bachchan to join Politics : उर्वशी रौतेला (Urvashi Rautela), कंगणा राणौत (Kangana Ranaut), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यासह आता आणखी एका बॉलीवूड कलाकाराच्या राजकारणातल्या एन्ट्रीची चर्चा सुरु आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा देखील आता राजकारणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबातला आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाऊन बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिषेक बच्चनची आई जया बच्चन (Jaya Bachchan) या देखील राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांना समाजवादी पक्षाकडूनच खासदारकी देण्यात आलीये.
अभिषेक बच्चन समाजवादी पार्टीकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर अभिषेक बच्चनला लोकसभेचं तिकीट मिळालं तर इतर पक्षांसाठी मतदारसंघात आव्हान उभं ठाकू शकतं. पण अद्याप यावर अभिषेककडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत भाष्य करण्यात आलं नाहीये. त्यामुळे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेला अभिषेक बच्चन राजकारणात जनेतेची मनं जिंकू शकेल का याची देखील उत्सुकता सगळ्यांना आहे.
या मतदारसंघातून अभिषेकला तिकीट मिळण्याची शक्यता
अभिषेकला मध्ये प्रदेशातील खजुराहो या मतदारसंघातून अभिषेकला तिकीट मिळू शकते. त्यामुळे समाजवादी पक्षाकडून मध्य प्रदेशातील मतदारसंघातून लोकसभेची अभिषेकची वर्णी लागू शकते. पण आता अभिषेक त्याची राजकारणातली एन्ट्री फिक्स करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अभिषेकचा अभिनयाचा प्रवास
अभिषेक हा नुकताच काही महिन्यांपूर्वी आलेल्या घुमर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आा होता. या सिनेमासाठी त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच अभिषेक आता शुजित सरकारच्या नव्या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
जया बच्चन राज्यसभेवर खासदार
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) या त्यांच्या अभिनयासह त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी देखील ओळखल्या जातात. राजकारणात जरी सक्रिय असल्या तरीही जया बच्चन या अभिनय क्षेत्रातही अजून सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन (Jaya Bachchan Net Worth) या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. दरम्यान जया बच्चन या पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. त्या गेल्या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार होत्या. या पक्षातून पुन्हा त्यांनाच राज्यसभेत पाठवण्यात आले आहे.