(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Annapoorani: 'अन्नपूर्णी'मधील 'त्या' डायलॉगमुळे झालेल्या वादानंतर आता नयनतारानं मागितली माफी; म्हणाली...
Annapoorani Movie Controversy: 'लेडी सुपरस्टार' अशी ओळख असणाऱ्या नयनताराचा 'अन्नपूर्णी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटातील एका डायलॉगमुळे वादाला तोंड फुटलं.
Annapoorani Movie Controversy: अनेक वेळा चित्रपटातील डायलॉग्स तसेच चित्रपटातील सीन्समुळे वाद निर्माण होते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला अॅनिमल हा चित्रपट वादग्रस्त चित्रपट ठरला. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीन्सला अनेकांनी ट्रोल केलं. पण तरीही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशताच 'लेडी सुपरस्टार' अशी ओळख असणाऱ्या नयनताराचा (Nayanthara) 'अन्नपूर्णी' (Annapoorani) हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील एका डायलॉगमुळे वादाला तोंड फुटलं. हा वाद इतका चिघळला की, काही नेटफ्लिक्सला हा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन डिलिट करावा लागला. या सर्व वादानंतर आता नयनतारानं एक पोस्ट शेअर करुन तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
नयनतारानं मागितली माफी (Annapoorani Movie Controversy)
नयनतारानं 'अन्नपूर्णी' या चित्रपटातील डायलॉगमुळे झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांची माफी मागितली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "जय श्रीराम,मी ही पोस्ट जड अंतःकरणाने आणि सत्याच्या आधारे लिहित आहे. अलीकडच्या काळात आपल्या 'अन्नपूर्णी' चित्रपटाबाबत जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल मी सर्व देशवासीयांना संबोधित करू इच्छिते. कोणताही चित्रपट बनवणे ही केवळ आर्थिक लाभाची गोष्ट नसून त्याच्यामागे संदेश देण्याची भावना देखील असते. 'अन्नपूर्णी' चित्रपटासाठी मी हेच सांगू शकतो की, या चित्रपटाच्या भावना आणि यामागील कष्ट एका निरागस मनाने केले आहेत, ज्याचा उद्देश जीवनाचा प्रवास प्रतिबिंबित करणे आणि प्रबळ इच्छाशक्तीने अडथळे पार करणे हे आहे.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता: नयनतारा
"सकारात्मक संदेश देण्याच्या आमच्या प्रामाणिक प्रयत्नात आम्ही अनवधानाने तुमच्या भावना दुखावल्या. यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आमचा सेन्सॉर केलेला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. कोणाच्याही भावना किंवा श्रद्धा दुखावण्याचा माझा आणि माझ्या टीमचा हेतू नव्हता. असे कृत्य, अगदी नकळत झाले कारण मी स्वतः देवावर पूर्ण श्रद्धा असलेली आणि देशभरातील मंदिरांना भेटी देणारा व्यक्ती आहे.", असंही नयनतारानं पोस्टमध्ये लिहिलं.
नयनतारा म्हणाली, "सर्वांची मी मनापासून माफी मागते"
पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "या प्रकरणाचे गांभीर्य समजून ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सर्वांची मी मनापासून माफी मागते .'अन्नपूर्णी' चित्रपटामागील आमचा उद्देश दुखावण्याचा नव्हे तर उन्नती आणि प्रेरणा देण्याचा होता. गेल्या दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीतील माझा प्रवासात एकमेकांकडून शिकणे आणि सकारात्मकता वाढवणे या उद्देशाच्या शोधात आहे ."
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
"राम मांसाहारी होता" या अन्नपूर्णी चित्रपटातील डायलॉगमुळे वाद निर्माण झाला. अन्नपूर्णी या चित्रपटामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप अनेक लोकांनी केला. एका हिंदू संघटनेने चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात जबलपूरमध्ये एफआयआर दाखल केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: